Nitin Upasani
sakal
नाशिक: बनावट शालार्थ (विद्यार्थी नोंदणी) ओळखपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना अटक करण्यात आली आहे. शहर गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे विभागाने केलेल्या या कारवाईनंतर शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. याच प्रकरणात नाशिक रोड पोलिस ठाण्यातील तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांना निलंबित करण्यात आले आहे.