घसरले भाज्यांचे दर; मेथीची जुडी अवघ्या 10 रुपयांत | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vegetables

घसरले भाज्यांचे दर; मेथीची जुडी अवघ्या 10 रुपयांत

sakal_logo
By
दत्ता जाधव

पंचवटी (नाशिक) : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीसह बुधवारच्या आठवडे बाजारात पालेभाज्यांसह फळ भाज्यांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. मोठ्या आवकेनंतर मागणी नसल्याने भाज्यांचे दर सर्वसामान्य गृहिणींच्या आटोक्यात आले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी चाळीस ते पन्नास रुपयांना मिळणारी मेथीची जुडी अवघी दहा रूपयांत उपलब्ध होती.

भाज्या गृहिणींच्या बजेटमध्ये

पितृपक्ष व त्यानंतर आलेल्या नवरात्रात पालेभाज्यांचे दर तेजीतच राहिले. या काळात मेथीच्या एका जुडीसाठी चाळीस ते पन्नास रुपये मोजावे लागत होते. या काळात कोथिंबीर, गवार यांचे भावही गगनाला भिडल्याने अनेक गृहिणींचे बजेट कोलमडून गेले होते. परंतु, दिंडोरी रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत काही दिवसांपासून पालेभाज्या, फळ भाज्यांसह वेलवर्गीय भाजीपाला आवकेत मोठी वाढ झाली आहे. याचा परिणाम आठवडे बाजारातील भावांवर होऊन सर्वच प्रकारच्या भाज्या गृहिणींच्या बजेटमध्ये आल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे गत काही दिवसांपासून म्हणजे दिवाळीपासून रोडावलेला हा बाजार चांगलाच बहरला. त्यामुळे खरेदीसाठी सायंकाळी गंगाघाटावर पाय ठेवायलाही जागा नव्हती, इतकी गर्दी झाली होती.

हेही वाचा: नाशिक | दुर्दैवी! दोन सख्ख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान केल्याने मागील आठवड्यापर्यंत मेथी, कोथिंबिरीच्या दरांत मोठी वाढ झाली होती. बाजार समितीतही त्यांना विक्रमी भाव मिळत होता. परंतु, गत दोन दिवसांपासून मेथीसह कोथिंबिरीची मोठी आवक झाल्याने दरांत मोठी घसरण होऊन मेथी व कोथिंबिरीची जुडी अवघ्या दहा रूपयांत उपलब्ध होती. इतर भाज्यांनाही मागणी नसल्याने भावात मोठी घसरण झाल्याचे चित्र होते.

भाज्यांचे दर असे -

मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू - १० रुपये जुडी
वांगी - ३० ते ४० रुपये. किलो
टोमॅटो - २० ते ३० रुपये
बटाटे - २० ते ३० रुपये किलो
गवार (गावठी) - ६० ते ८० रुपये किलो
हिरव्या मिरच्या - ४० रुपये किलो.
कारली - ३० ते ४० रुपये

हेही वाचा: महामार्गावर चोरट्यांचा प्रताप; टेम्पोसह लांबवला 15 लाखांचा मद्देमाल

loading image
go to top