Farmer Agitation : थकबाकीदार शेतकऱ्यांचा उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

collector office Nashik latest marathi news
collector office Nashik latest marathi newsesakal
Updated on

Farmer Agitation : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सुरू केलेली सक्तीची वसुली व शेतकऱ्यांच्या सातबारा खाते उताऱ्यावर शेतकऱ्याचे नाव कमी करून त्या जागेवर विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे नाव लावण्याचे काम तत्काळ थांबवावे, तसेच शासनाने या थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, या मागणीसाठी बुधवारी (ता.१४) गोल्फ क्लब मैदानापासून शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. (Farmer Agitation Arrears farmers will march to nashik Collectorate tomorrow)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

collector office Nashik latest marathi news
Farmer Scheme: शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर योजना! पात्र शेतकऱ्यांनी 15 जूनपर्यंत आधार प्रमाणीकरण करावे

मोर्चा सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेवर व विभागीय सहनिबंधक कार्यालयावर जाणार आहे. या मोर्चात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे, सुधाकर मोगल, दिलीप पाटील, रावसाहेब एतवाडे, कैलास बोरसे यांनी केले आहे.

१६ जानेवारी रोजी मालेगाव येथे पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरावर बिऱ्हाड मोर्चा ने जाऊन निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी दिलेले आश्वासन सहा महिने उलटूनही पालकमंत्री भुसे व शासनाने पाळले नसल्याने एक जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन व उपोषण सुरू केले आहे.

मात्र अजूनही शासन लक्ष देत नसल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी मोर्चाचे आयोजन केले आहे. यात शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटना, तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

collector office Nashik latest marathi news
Girls Higher Education : मुलींच्या उच्च शिक्षणासाठी तैनवाला फाउंडेशनतर्फे बिनव्याजी अर्थसाहाय्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com