शेतकऱ्यावर डिझेल टाकून जाळले; 13 जणांवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

शेतकऱ्यावर डिझेल टाकून जाळले; 13 जणांवर गुन्हा दाखल

येवला (जि. नाशिक) : कुसूर येथे जमिनीच्या बांधाच्या वादातून दोघा जणांनी एका शेतकऱ्यावर डिझेल टाकून पेटवून देण्याचा (Attempt to Killed) प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल झाला असून, संग्राम मेंगाळ व राहुल हिंगे यांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. (Farmer burned by diesel due to farm dispute Charges filed against 13)

याबाबत दिलीप शेषराव गायकवाड (वय ५५) यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गायकवाड हे कुसूर येथील म्हसोबावाडी रस्त्यावर राहतात. त्यांच्या शेतातील जमिनीचा बांध फोडून ३० ते ४० फूट जमीन आरोपींनी नांगरली होती. याबाबत ते आरोपींना समजावून सांगण्यासाठी गेले असता, त्या वेळी आरोपींनी गायकवाड यांचे म्हणणे ऐकले नाही. शिवाय गायकवाड यांच्यावर दादागिरी केली. त्याचवेळी संग्राम मेंगाळ व राहुल हिंगे यांनी पाण्याच्या बाटलीतून डिझेल आणून गायकवाड यांच्या अंगावर ओतले, तर मेंगाळ यांनी माचीसची काडी पेटवून फिर्यादीला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले असून, गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा: 'कलिंगड खावायेना अन् लिंबू पाव्हाले मिळेना'

याप्रकरणी पोलिसांनी संग्राम मेंगाळ, राहुल हिंगे, मोनाली हिंगे, दीपक हिंगे, नीलेश हिंगे, रामदास मेंगाळ, सुमनबाई मेंगाळ, भागिनाथ हिंगे, किरण हिंगे, नवनाथ मेंगाळ, मथुराबाई हिंगे, दिलीप हिंगे, सर्जेराव हिंगे, रवींद्र नवले या तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर संग्राम मेंगाळ व राहुल हिंगे यांना अटक केली आहे. या दोघांना ९ मेपर्यंत न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक एकनाथ भिसे तपास करत आहेत. दिलीप गायकवाड यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू असून, ते ४० टक्के भाजले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा: NEET परीक्षेसाठी अर्जासाठी १५ मेपर्यंत मुदतवाढ

Web Title: Farmer Burned By Diesel Due To Farm Dispute Charges Filed Against 13 Nashik Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top