
'कलिंगड खावायेना अन् लिंबू पाव्हाले मिळेना'
देवळा (जि. नाशिक) : जिल्ह्यातील आठवडे बाजारात तसेच रस्त्यांवर सध्या कलिंगडच कलिंगड (Watermelon) विक्रीसाठी दिसत असून एवढे मोठे फळ स्वस्तात विक्री होत असल्याने त्याला प्रतिसादही मिळत आहे, मात्र दुसरीकडे एवढासा लिंबू (Lemon) भाव खाताना दिसत आहे. त्यामुळे 'कलिंगड खावायेना अन लिंबू पाव्हाले मिळेना' असे चित्र दिसून येत आहे. (rising watermelon demand in market lemon price hike due to summer)
कसमादे भागात यावर्षी कलिंगडाचे पीक जोमात व मोठ्या प्रमाणात आले. त्यामुळे जिकडे-तिकडे कलिंगडच कलिंगड पाहायला मिळत आहेत. बाजारात तसेच रस्त्यांवर ट्रॅक्टर ट्रॉली भरून शेतकरी विक्रीसाठी बसलेले दिसतात. परंतु आवक जास्त झाल्याने कलिंगडाचे भाव मात्र पुरते कोलमडले. दोन ते चार रुपये किलो आणि नगावर १० ते २० रुपये असे कमीच भाव मिळत आहेत. कलिंगडाच्या मानाने अत्यंत किरकोळ असणारा लिंबू मात्र दहा रूपयाला एक मिळत आहे. यावर्षी लिंबूचे उत्पादन कमी आल्याने आणि त्यात उन्हाळा तीव्र असल्याने लिंबूला मोठी मागणी आहे. जेवणात, सरबत करण्यासाठी, उसाच्या रसात व इतरही अनेक बाबींसाठी लिंबू आवश्यक असतो. त्यामुळे लिंबू भाव खात आहे.
हेही वाचा: NEET परीक्षेसाठी अर्जासाठी १५ मेपर्यंत मुदतवाढ
"यंदा मोठ्या उत्साहाने कलिंगडाची लागवड केली. सुरुवातीला चांगला भाव मिळाला असला तरी नंतर मात्र या पिकाने निराशाच केली. खते, फवारणी, मजुरी यात होणारा खर्च आणि दोन ते चार रूपये किलो हा भाव शेतकऱ्यांना परवडणारा नाही. तरीही त्याला ओरडून आपला माल विकावा लागतो हे त्याचे दुर्भाग्यच नाही का ?"
- बापूजी भामरे, कलिंगड उत्पादक, खुंटेवाडी, ता.देवळा
हेही वाचा: ‘भोंगा‘यण प्रकरणी पोलिसांकडून दणका; मालेगावी भोंग्याविना अजान
Web Title: Rising Watermelon Demand In Market Lemon Price Hike Due To Summer Nashik Summer News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..