Nashik News: खेलदरीत शेतकऱ्याची कर्जामुळे आत्महत्या

Farmer commits suicide due to debt in Kheldari nashik news
Farmer commits suicide due to debt in Kheldari nashik newsesakal

Nashik News: दुष्काळाची दाहकता प्रचंड वाढली असतानाच खेलदरी (ता. चांदवड) येथील शेतकरी संतोष ठोके यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील दुष्काळाचा पहिला बळी गेल्याची शासन दप्तरी नोंद चांदवड तालुक्यातून झाली आहे. सोमवारी (ता.३०) ही घटना घडली. (Farmer commits suicide due to debt in Kheldari nashik news)

खेलदरी येथे संतोष निवृत्ती ठोके (४०) यांनी राहत्या घराजवळील गोठ्यात गळफास घेतल्याचे आज समोर आले. अतिवृष्टी, गारपीट अन् यंदाची कोरडा दुष्काळ परिस्थिती यामुळे घेतलेले सुमारे २२ लाखांचे कर्ज फेडायचे कसे या विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पुढे आले आहे.

श्री. ठोके यांची खेलदरी येथे पाच एकर शेती आहे. शेतीसाठी त्यांनी खेलदरी विविध कार्यकारी सोसायटीकडून दहा लाख, पिंपळगाव बसवंत येथील पतसंस्थेचे नऊ व फायनान्सचे तीन लाख असे कर्ज घेतले होते.

Farmer commits suicide due to debt in Kheldari nashik news
Nashik Fraud Crime: मालेगावच्या कर सल्लागाराला बनावट पावत्याप्रकरणी अटक; 86 कोटींचे बनावट इनव्हॉइस

गतवर्षी अतिवृष्टी, गारपीट यामुळे पिकांचे नुकसान झाले, काहीच उत्पन्न हाती लागले नाही. यंदा कोरडा दुष्काळ पडल्याने पीकच घेता आले नाही. यामुळे कर्ज फेडायचे कसे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा अशी विवंचना होती.

यातूनच ठोके यांनी सोमवारी जीवनयात्रा संपविली. या प्रकरणी वडनेरभैरव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. ठोके यांच्यावर कर्ज आहे किंवा नाही, याचा पंचनामा धोडंबेचे मंडळ अधिकारी राज पाटील, तलाठी विशाखा गोसावी यांनी केला. ठोके यांच्या सातबाऱ्यावर कर्जदारांचा बोजा चढविल्याची नोंद आहे.

Farmer commits suicide due to debt in Kheldari nashik news
Nashik News: सुरक्षा अधिकाऱ्याने गैरवर्तणूक न केल्याचा ‘आयओसी’ चा दावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com