VIDEO : शेतकऱ्याने चालविली स्वप्नांवर कुऱ्हाड.. जड अंतकरणाने तोडली उभ्या पिकासह द्राक्षबाग 

grapes crops lakhmapur 1.jpg
grapes crops lakhmapur 1.jpg

नाशिक / लखमापूर : कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला तो केवळ द्राक्ष उत्पादकांनाच. याचे बोलके उदाहरण मोहाडी ता. दिंडोरी येथील नारायण जाधव या द्राक्ष उत्पादकांनी सुमारे तीनशे क्विंटल द्राक्षांसह आपली दोन एकर बागच तोडून टाकल्याने लक्षात येते. नाशिक जिल्ह्यात अवघ्या काही दिवसांचा द्राक्ष हंगाम शिल्लक असतांना कोरोनोच्या संकटाने संपूर्ण शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले आहे. एकीकडे शासनाने द्राक्ष वाहतुकीसाठी वाहतूक यंत्रणा खुली केली असली तरी अपेक्षित उठाव नसल्याने कोणताही द्राक्ष व्यापारी द्राक्षबाग खरेदी करत नाही. शासनाने शिल्लक बागांचे बेदाणे बनविण्यासाठी फॉर्म भरून घेण्याचे काम सुरु केले आहे, मात्र सध्याच्या संपूर्ण लॉकडाऊन मुळे बेदाणे बनविण्यासाठी लागणारे औषधे उपलब्ध होत नसल्याने अजूनच अडचणीत भर पडत आहे. 

शेतकऱ्याने तोडली उभ्या पिकसह द्राक्षबाग 

सध्या द्राक्ष बागायतदाराची अवस्था "आई जेऊ घालीना, बाप भिक माघु देईना" अशी झाली आहे. मोहाडी येथील नारायण एकनाथ जाधव या शेतकऱ्याने सुमारे तीनशे क्विंटल द्राक्ष असलेली दोन एकर द्राक्षबाग गेल्या पंधरा दिवसांपासून विक्री साठी तयार होती. मात्र कोरोनाच्या हाहाकारामुळे द्राक्षबागा खरेदीसाठी व्यापारी फिरकत नव्हते. त्यातच बेदाणे बनविण्याचा विचार समोर आला तर त्यासाठी आवश्यक असणारी औषधे मिळत नसल्याने शेवटी जड अंतकरणाने मोठ्या कष्टाने उभी केलेली द्राक्षबाग जाधव यांनी उभ्या पिकासह तोडून टाकली.

नारायण जाधव यांचा एक बाग वीस दिवसांपूर्वीच बेदाण्याला दिला आहे. त्याचीही एक दमडीही त्यांना आजपर्यंत मिळालेली नाही. यामुळे आता त्याच्यावर असलेले सुमारे दहा लाखांचे, हात उसने, पावडरी वाल्याची उधारी, द्राक्ष मजुरांची मजुरी व पाच सहा जणांचे कुटुंब यांचा चरितार्थ कसा चालवायचा असा प्रश्न त्यांच्या समोर आहे. निसर्गाच्या संकटांवर मात करत अत्यंत सुंदर असा सुमारे अडीचशे ते तीनशे क्विंटल द्राक्षांपासून किमान दहा लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते. हि द्राक्ष तयार करण्यासाठी त्यांना तब्बल साडेतीन लाख रुपयांचा खर्च आला आहे. मात्र त्या पासून आता एकही रुपया मिळणार नसून उलट झालेला खर्च व देणेदारी कशी फेडणार असा प्रश्न आता समोर आहे. :- नारायण जाधव, द्राक्ष उत्पादक मोहाडी.

कोरोनाचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादकांना बसला आहे. सरकार रस्त्याने गाड्या पाठवते मात्र रस्त्यावर माल खरेदी करणारेच नसल्याने त्याला कोण खाणार आहे. बेदाणे बनविण्यासाठी लागणारी सामग्री मिळत नाही. ना बेदाणा व्यापारी द्राक्ष घेत माग याची विल्लेवाट लावायची तरी कशी असा प्रश्न होता. त्यांनी घेतलेला निर्णय टोकाचा जरी असला तरी पर्यायही दिसत नव्हता हेही तितकेच खरे आहे. - प्रवीण जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य.

शासनाच्या निर्णया मुळे निर्यात व्यवस्था अडचणीत आली आहे. वास्तविक शासन ज्या सुरक्षिततेच्या उपाय योजना आज सांगत आहे त्या निर्यातदार गेल्या काही दशकांपासून करत आहे. कोरोना काही दिवसांत संपेल हि मात्र अवघ्या काही दिवसांचा शिल्लक असलेला द्राक्ष हंगाम पुन्हा सुरु होणार नाही व याचा फटका शेतकऱ्यांना अनेक वर्ष भेगवा लागणार आहे. सुरेश कळमकर :- द्राक्ष निर्यातदार.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com