कोरोनामुळे मिरची घसरली! उत्पादन खर्च निघणेही मुश्‍कील

chilly
chillyesakal

येवला (जि.नाशिक) : कोरानाने (corona virus) सर्वच व्यवसायाचे नुकसान झाले. शेतकरीही त्यातून सुटला नसून कांदा उत्पादकांपासून ते भाजीपाला पिकवणारा शेतकरी (farmers loss) यात भरडला जात आहे. लॉकडाउनमुळे तर या नुकसानीत अजूनच भर पडल्याने शेतकरी आता मेटाकुटीला आला आहे.(farmer loss due to corona virus)

पारंपरिक शेतीपलीकडे जाऊन वेगळे काहीतरी पीक घ्यावे आणि त्यातून दोन पैसे मिळवावेत, या अपेक्षेवर मिरचीचे पीक (chilly crop) घेतले खरे; पण ही मिरची हिरवीची लाल झाली, तरीही तिला गिऱ्हाईक मिळेनासे झाले आहे. त्यामुळे मिरची घेता का मिरची, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर (farmers) आली आहे. हाच अनुभव येथील शेतकरी नानासाहेब शिंदे घेत असून, लाखो रुपयांचा तोटा सहन करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या शेतकऱ्यांची अर्थव्यवस्थाच कोरोनाने डबघाईला आणली असून, टाळेबंदीचा फटका मिरची उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला आहे.

chilly
वीस लाख लोकसंख्येसाठी अवघे बारा मानसोपचारतज्ज्ञ

येथील नानासाहेब शिंदे या शेतकऱ्याने एक एकरात मिरचीची लागवड केली. लागवड केल्यापासून उत्पन्न सुरू होईपर्यंत सुमारे दोन लाखांचा खर्च आला. उन्हाळ्यात हिरव्या मिरचीला चांगला बाजारभाव मिळेल, या आशेपोटी शिंदे यांनी फेब्रुवारीत मिरचीची लागवड केली होती. तीन-साडेतीन महिन्यांनंतर मिरचीचे उत्पादन सुरू व्हायच्या वेळेस शासनाकडून टाळेबंदी जाहीर करण्यात आल्याने शेतात तयार असलेली मिरची बाजारात घेऊन जाता येईना, अशी वेळ आली आहे. त्यांनी युक्ती शोधत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतावरच मिरची विक्री केली असून, या विक्रीतून ६० ते ७० हजार रुपये हाताशी आले. दोन लाख रुपये भांडवल अडकवून हाती ७० हजार रुपये आल्याने शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय असल्याची उद्विग्न भावना शिंदे यांनी व्यक्त केली.

एक एकर मिरची लागवडीतून दोन लाख रुपये खर्च केल्यानंतर चांगले उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा असताना आता भांडवलही सुटते की नाही, असा प्रश्न शिंदे यांना पडला आहे. त्यामुळे नफा मिळेल अन्‌ हाती चार पैसे येतील, ही अपेक्षाही फोल ठरली आहे. टाळेबंदीमुळे मजूर मिळेनासा झाल्याने आता मिरची झाडावरच लाल होऊ लागली आहे. काही दिवसांत पावसाला सुरवात होणार असून, झाडावर लाल झालेली मिरची जर तोडली नाही, तर ती सडून जाण्याची भीती त्यांना वाटत आहे. या नुकसानीमुळे खरिपासाठी भांडवल उभे करण्याचा प्रश्न त्यांना सतावत आहे.

chilly
तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी नाशिक महापालिका सज्ज

एक एकर क्षेत्रावर मिरचीची लागवड केली. यासाठी दोन लाख रुपये खर्च आला. मिरची विक्रीला येणार, त्याचवेळी लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने मिरची बाजारात विक्रीसाठी नेता आली नाही. त्यामुळे मोठे नुकसान झाले असून, काही मिरची विकली, तर काही झाडावरच आहे. आता लाल झालेली मिरची कशी तोडणार आणि तिला गिऱ्हाईक मिळणार का, हा प्रश्‍नच आहे.

- नानासाहेब शिंदे, शेतकरी, येवला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com