esakal | दुर्दैवी! खर्च करूनही हाती काहीच नाही; विवंचनेने ग्रासलेल्या शेतकऱ्याची अखेर हिम्मत सुटलीच
sakal

बोलून बातमी शोधा

sandip ahire farmer.jpg

शेतकऱ्याच्या मालकीची चार एकर शेती असून, यात दोन्ही भावंडे राबून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतात. दोन दिवसांपूर्वी शेतात पिकांना रासायनिक खते देण्यासाठी नातेवाइकांकडून व बाहेरून कर्ज काढून खते खरेदी केली होती. मात्र, एवढा खर्च करूनही हाती काही लागणार नाही.  नैराश्याने पार ग्रासले होते. अखेर हिम्मत सुटली आणि घेतला टोकाचा निर्णय.. 

दुर्दैवी! खर्च करूनही हाती काहीच नाही; विवंचनेने ग्रासलेल्या शेतकऱ्याची अखेर हिम्मत सुटलीच

sakal_logo
By
दिपक देशमुख

नाशिक / झोडगे : शेतकऱ्याच्या मालकीची चार एकर शेती असून, यात दोन्ही भावंडे राबून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतात. दोन दिवसांपूर्वी शेतात पिकांना रासायनिक खते देण्यासाठी नातेवाइकांकडून व बाहेरून कर्ज काढून खते खरेदी केली होती. मात्र, एवढा खर्च करूनही हाती काही लागणार नाही.  नैराश्याने पार ग्रासले होते. अखेर हिम्मत सुटली आणि घेतला टोकाचा निर्णय.. 

आर्थिक विवंचना आणि नैराश्य...

अतिपावसामुळे माळमाथा परिसरात दुबार पेरणी करावी लागली. शिवारात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचल्याने शेती उफाळल्याने बी-बियाणे, खते व मजुरी वाया गेली. संदीप अहिरे यांच्या मालकीची चार एकर शेती असून, यात दोन्ही भावंडे राबून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतात. दोन दिवसांपूर्वी शेतात पिकांना रासायनिक खते देण्यासाठी नातेवाइकांकडून व बाहेरून कर्ज काढून खते खरेदी केली होती. मात्र, एवढा खर्च करूनही हाती काही लागणार नाही. या नैराश्यातून संदीप यांनी सकाळी शेतातच कीटकनाशक घेऊन आत्महत्या केली. तीन वर्षांपूर्वी त्यांचे वडील प्रल्हाद अहिरे यांनीही शेतीत सततच्या नापिकीमुळे आत्महत्या केली होती. यातून कुटुंब सावरत असतानाच संदीप अहिरे यांनी शेतीत येणारे अपयश पुढील काळात मुलांचे शिक्षण, अविवाहित भाऊ, विधवा आई व पत्नी, दोन मुले यांची जबाबदारी, कुटुंबाचे पालनपोषण कसे करावे, या विवंचनेने ग्रासले होते. त्यामुळे नैराश्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.  
 

हेही वाचा > हृदयद्रावक! ताई आता कोण बांधणार गं राखी.. रिकामे मनगट घेऊन भावंड बघताएत वाट

उचलले टोकाचे पाऊल

अस्ताने (ता. मालेगाव) येथील तरुण अल्पभूधारक शेतकरी संदीप प्रल्हाद अहिरे (वय ४०) यांनी शेतात विषप्राशन करून आत्महत्या केली. यंदाच्या हंगामात परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले.

हेही वाचा > VIDEO : पहिल्याच प्रयत्नात झाला अधिकारी! सामान्‍य रिक्षाचालकाच्या मुलाची उंच भरारी...

रिपोर्ट -  दिपक देशमुख 

संपादन - ज्योती देवरे

loading image
go to top