नाशिक : विषारी सर्प दंशाने शेतकरी महिलेचा मृत्यू

घराच्या अंगणात भांडी घासत असताना अचानक पाठीमागून विषारी कोब्राने दंश केला.
death due to snake bite
death due to snake bitesakal

बाणगाव बुद्रुक (जि. नाशिक) : येथील महिलेचा शेतीकाम करीत असताना विषारी सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. सरला रवींद्र गोराडे (वय ३५) असे या महिलेचे नाव आहे. सरला गोराडे स्वतःच्या शेतात पत्र्याच्या घरात राहत होत्या. सायंकाळी नेहमीप्रमाणे त्या घराच्या अंगणात भांडी घासत असताना अचानक पाठीमागून विषारी कोब्राने दंश केल्याचे त्यांच्या लक्षात आले.

याबाबतची माहिती त्यांनी कुटुंबियांना दिल्यानंतर नांदगाव सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सरला गोराडे यांची घरची आर्थिक स्थिती बेताची आहे. तहसिलदारांनी शासनाच्या आपत्ती निवारण निधीतून गोराडे कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यांच्या पश्‍चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

death due to snake bite
Nashik | वरिष्ठ व्यवस्थापकाकडून सहकारी महिला अधिकाऱ्याचा विनयभंग
death due to snake bite
नाशिकमध्ये धावणार E-bus; तोटा शून्यावर आणण्यासाठी सिटीलिंकची योजना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com