'राज्याच्या राजकारणाचं प्रतिबिंब बैल पोळा सणावर!' युवा शेतकऱ्याचा नादच खुळा

farmer write political message on bulls back nashik marathi news
farmer write political message on bulls back nashik marathi news

नाशिक/ दाभाडी: शेतकरी बांधवांच्या आवडत्या सणावर यंदा कोरोनाचे संकट असतानाही सर्जा राजाच्या प्रती आदर तसूभरही कमी झालेला दिसला नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा मुक्त संचार असतानाही पिढीजात बैलांचा खुंटा मात्र अद्यापही कायम आहे. ग्रामीण भागात बैल पोळ्याचा उत्सवाने बैल आणि शेतकरी यांचं घट्ट नातं संकटकाळी अधोरेखित झालेच परंतु येथील युवा शेतकऱ्याने बैल पोळ्यानिमित्ताने राजकिय घोषवाक्यांची पेरणी करत अनोखी रंगत भरवली आणि चर्चेला उधाण आले.

राजकीय शेरेबाजी

येथील युवा शेतकऱ्यांने आपल्या सर्जा राजा या बैलजोडीला सजवतांना सर्जाचा अंगावर माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरदचंद्रजी पवार आणि मुख्यमंत्री ना. उध्दवजी ठाकरे यांचे चित्र रंगवत यांच्या राजकीय मैत्रीसह राजकीय शेरेबाजीचे अनोखे प्रतिबिंब रेखाटले आणि "जीवा शिवाची जोडी" अशी बिरुदावली रेखाटत आवडत्या नेत्यांना या ग्राम उत्सवात कौतुकाने मिरवले आहे. तर दुसऱ्या बाजूवर राजकिय कुरघोडी करतांना फडणवीसांना इशारा देतांना 'वाघ वाघच..'!' चा आत्मविश्वास रेखाटला आहे. तर दुसऱ्या बैलाचा अंगावर राज्याचे विद्यमान कृषीमंत्री ना.दादाजी भुसे यांचे चित्र रंगवत "बळीराजाचा कैवारी" असा आदर व्यक्त केला आहे. दुसऱ्या बाजूला या सर्व संकल्पनेला 'नाद खुळा' म्हणत वेगळेपण अधोरेखित केले आहे.

बैलांना बघण्यासाठी झुंबड

दाभाडी (मालेगाव, नाशिक) येथील युवा शेतकरी मयूर अमृत निकम यांनी ही भन्नाट संकल्पना राबविली असून स्थानिक प्रसिद्ध चित्रकार राम निकम यांच्या कुंचल्यातून नेत्यांचे अप्रतिम चित्रे रंगवून घेतली आहेत. गावकुसावर या बैलांना आणि संकलनेला बघण्यासाठी मोठी झुंबड उडाली तर आणि अनोख्या संदेशांमुळे दाद मिळत आहे. ग्रामीण व शहरी भागात या संकल्पनेला सोशल मीडियावर प्रचंड पसंतीसह कौतुकाची थाप मिळते आहे. राजकिय अभिनिवेश थेट बैल पोळ्यावर अवतरल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.


दरवर्षी वेगळी संकल्पना घेऊन प्रबोधन घडवणे सुरू असते.यंदा कोरोनाच्या संकट काळात शेतकऱ्यांना मदतीचा हात देणाऱ्या नेतृत्वाचा गौरव करत आहे.
- मयूर निकम, युवा शेतकरी, दाभाडी

संपादन - रोहित कणसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com