Onion tractors arrived by market committee on Wednesday.
Onion tractors arrived by market committee on Wednesday.esakal

Nashik Onion News : कांदा पुन्हा गडगडला; बळीराजाची वाढली चिंता

कांद्याचे दर पुन्हा घसरले असून, कांद्याला सरासरी एक हजार ३१० रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांची पुन्हा निराशा झाली.

Nashik Onion News : बाजार समितीत कांद्याचे दर पुन्हा घसरले असून, कांद्याला सरासरी एक हजार ३१० रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांची पुन्हा निराशा झाली. कांद्याला निच्चांकी दर मिळाल्याने कांदा उत्पादक आर्थिक अडचणीत सापडला आहे.

कांदा निर्यातबंदीनंतर रोज कांद्याच्या दरात घसरण होत असून, केंद्र सरकारकडून निर्यातबंदी उठविण्यासंदर्भात कुठलाही तोडगा निघत नसल्याचे दिसत आहे. (farmers are disappointed due to onion prices have fallen again in market committee nashik news)

नोव्हेंबर २०२३ मध्ये लाल कांद्याची आवक सुरू झाल्यानंतर डिसेंबरच्या दुसऱ्या सप्ताहापर्यंत आवक मर्यादित होती. तेव्हा प्रतिक्विंटल साडेतीन हजार रुपयांपर्यंत सरासरी दर होते. मात्र, निर्यातबंदीमुळे क्विंटलमागे दोन हजार रुपयांपर्यंत घसरण झाल्याने शेतकऱ्यांना कोट्यवधींचा तोटा झाला आहे.

जानेवारीच्या सुरवातीला १८०० ते १९०० रुपयांवरून दर १३०० रुपयांवर आले आहेत. त्यामुळे क्विंटलमागे ६०० रुपयांपर्यंत तोटा सोसण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दिवसेंदिवस कांदा उत्पादकांची आर्थिक कोंडी वाढत असल्याची गंभीर स्थिती आहे.

Onion tractors arrived by market committee on Wednesday.
Nashik Onion News : मालेगावच्या दक्षिण पट्ट्यातही उन्हाळ कांदा लागवडीची धूम

देशांतर्गत कांद्याचा पुरवठा व्हावा व दर नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने ७ डिसेंबरला निर्यातबंदीचा निर्णय घेतला. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी फास ठरत आहे. राज्यातील प्रमुख कांदा उत्पादक पट्टा असलेल्या नाशिक जिल्ह्यात लासलगाव, पिंपळगाव बसवंत या बाजार आवारांमध्ये कांद्याला जानेवारीच्या सुरवातीला सरासरी १८०० ते २००० रुपयांपर्यंत सरासरी दर होता.

सध्या लाल कांदा सरासरी १३०० रुपये दराने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कांदा निम्याहून अधिक दराने कोसळल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे. घाऊक बाजार ३४ रुपयांवर गेलेल्या कांद्याने शेतकऱ्यांना आशा दाखविली होती, पण निर्यातबंदी जाहीर झाली व भावाला ग्रहण लागले.

त्यानंतर भाव गडगडतच गेले. नाशिक जिल्ह्यातील लाल कांद्यासह गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशातील कांदाही बाजारात येण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे आता तरी कांदा निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी कांदा उत्पादकांकडून होत आहे.

Onion tractors arrived by market committee on Wednesday.
Nashik Onion News : ‘कांदाप्रश्नी निदान नाहीच; मात्र उपचार जालीम’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com