तीन पिकांपुरता उरला येवल्याचा रब्बी हंगाम; प्रथमच रब्बी मक्याला पसंती, तेलबियांचे क्षेत्र शून्यावर 

crops.
crops.
Updated on

येवला (नाशिक) : शेती प्रगत झाली, तसेच जोडीनेच अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याने पारंपरिक पिके इतिहास जमा होता की काय, असे वाटू लागले आहे. कारण रब्बी हंगामात तालुक्यात सर्व तेलबियांचे क्षेत्र शून्यावर आले आहे. याशिवाय गहू, हरभरा व कांदे या तीन पिकांपुरताच रब्बी हंगाम उरल्याचे चित्र आहे. 

येवला तालुका अवर्षणप्रवण असल्याने येथे रब्बी पिके घेतली जात नाहीत. तालुक्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र ५३ हजार हेक्टर आहे. मात्र तब्बल ८० हजार हेक्‍टरवर पेरणी होते. याउलट रब्बीचे क्षेत्र दहा हजार हेक्टर असून, दहा ते अकरा हजार हेक्‍टरवर पिके घेतली जातात. त्यातही पावसाने सरासरी ओलांडत सर्वदूर समाधान केले तरच तालुक्यात रब्बीची पिके घेतली जातात अन्यथा पालखेड डावा कालव्याचे लाभक्षेत्रातील ५२ गावांच्या आसपासच रब्बी फुलतो. 

५८ टक्क्यांवर पेरण्या पूर्ण

उत्तर-पूर्व भागातील गावात तर दोन-तीन वर्षांतून एकदाच रब्बीची पिके घेतली जातात. या वर्षी सर्वदूर रब्बी पिके घेतली जाणार आहेत. कारण अद्यापही अवर्षणप्रवण भागातील विहिरीदेखील तुडुंब आहेत. त्यातच फेब्रुवारीनंतर टंचाईच्या भीतीने शेतकऱ्यांनी रब्बीची पेरण्याही मार्गी लावल्या असून, आतापर्यंत सुमारे ५८ टक्क्यांवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. 


प्रथमच रब्बी मक्याला पसंती 

तालुक्यात गहू, हरभरा व लाल कांद्याचे क्षेत्र रब्बी हंगामात सर्वाधिक असते. किंबहुना या पिकांसाठी रब्बी हंगाम तालुक्यात घेतला जात आहे. या वर्षी काहीसा बदल झाला असून, सरासरी क्षेत्राच्या तुलनेत अधिक क्षेत्रावर रब्बी मक्याची लागवड झाली आहे. हमीभाव चांगला मिळत असल्याने शेतकरी रब्बी मक्याकडे वळालेले दिसताय. सोबतच भाजीपाल्याचे क्षेत्रही टिकून आहे. एकेकाळी रब्बी हंगामातही सूर्यफूल, तीळ, जवस, करडई आदी तेलबियांची पिके घेतली जायची. त्याचे क्षेत्र मात्र आता शून्यावर आले आहे. या वर्षी नव्याने १५७ हेक्‍टरवर उसाची लागवड झाली असून, जास्त पावसाचा हा परिणाम आहे. तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यात ज्वारीचे मोठे क्षेत्र दर वर्षी असते. तब्बल ७०० हेक्टर ज्वारी घेतली जाते. या वर्षी मात्र पन्नास हेक्‍टरवर आतापर्यंत ज्वारीची पेरणी झाली असून, काद्याचे व मक्‍याचे क्षेत्र वाढल्याने ज्वारीकडे शेतकऱ्यांनी कानाडोळा केल्याचे दिसते. 

असे क्षेत्र, अशी पेरणी... 

पीक सरासरी क्षेत्र पेरणी टक्के 
ज्वारी ७४१ ५० ७ 
गहू ६,०८७ ३,३९१ ५६ 
मका ३७१ ४५७ १२३ 
हरभरा ३,७६७ २,२९२ ६१ 
एकूण १०,९६८ ६,३४७ ५८ 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com