Farmers
Farmersesakal

नाशिक : शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून बनवला रस्ता

Published on

इगतपुरी (जि. नाशिक) : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी ग्रामीण रस्ते म्हणजे जीवनवाहिनी ( Lifeline) आहे. मात्र नेमकी हिच सुविधा नसेल तर शेतकऱ्यांना आपला दर्जेदार शेतीमाल बाजारपेठेत पोहोचवता येत नाही. यामुळे निर्माण होणारे नैराश्य अप्रगत करीत असते. या सगळ्या पार्श्वभूमीवर नागोसली (ता.इगतपुरी) (Igatpuri) येथे शेतकऱ्यांनी एकत्र येत लोकवर्गणी आणि श्रमदानातून (Public Participation) रस्त्याचे काम केले आहे.

Farmers
अपुऱ्या मनुष्यबळाचा कर्मचाऱ्यांवर ताण; वीज केंद्रासमोर आंदोलन

गावापासून ते स्मशानभूमी भागात जाणाऱ्या एक किलोमीटरच्या रस्त्याच्या कामाची गेल्या २० वर्षांपासून प्रतीक्षा होती. मात्र या परिसरातील शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यानुसार येथील शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन नागोसली गाव ते स्मशानभूमी रस्त्याचे काम पूर्ण केले आहे.

Farmers
नाशिक : वीज बंद केल्याने वायरमनला मारहाण

लोकवर्गणी काढून केलेल्या रस्त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा होणार असून स्मशानभूमीकडे जायला चांगला मार्गही मिळणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी शेतकरी ज्ञानेश्वर जोंधळे, शाम शिंदे, देवराम राऊत, पोलिस पाटील कुंडलिक ताठे, कैलास ताठे, दत्तू शिंदे, गजीराम जोंधळे, संजय होले, सुखा होले, गिरीधर शिंदे, राजू शिंदे, जयेश जोंधळे, गोविंद रातड, माया शेलार, रामदास होले आदी शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन काम पूर्ण करून घेतले. या रस्त्याच्या भक्कम कामासाठी शासनाच्या निधीतून काम होणे आवश्यक असल्याने नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना साकडे घालण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com