नाशिक : द्राक्षाच्या बाजारभावाने बळीराजाची निराशा

Farmers
Farmers esakal

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू झाल्यानंतर अवकाळी पावसाचे संकट, पाच राज्यांतील निवडणुका, डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्चात झालेली वाढ यामुळे द्राक्षाच्या उत्पन्नाचा गोडवा काहीसा कमी मिळाला. हंगामात बहुतांश कालावधीत दर नीचांकी राहिल्याने शेतकऱ्यांची निशारा झाली, तर व्यापाऱ्यांसाठीही हंगाम फारसा फायद्याचा राहिला नाही. इंधन दरवाढीमुळे ट्रान्‍स्पोर्ट व्यवसायही तोट्यात राहिला. द्राक्ष हंगामाची येत्या दोन दिवसांत सांगता होणार आहे.

नववर्षाच्या प्रारंभी नाशिक जिल्हा जगाचे लक्ष वेधून घेतो तो अवटी, गोड द्राक्ष हंगामामुळे. हिरव्या, काळ्या रंगांची द्राक्ष सातासमुद्रापार पोचत खवय्याच्या जिभेवर गोड चव पेरतात. गेली तीन महिन्यांपासून नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, दिंडोरी, गिरणारे, सटाणा आदी परिसरात द्राक्ष हंगामाची लगबग सुरू होती. दररोज सुमारे ५०० ट्रकमधून १० टन द्राक्ष देश-परदेशात पोचत होती. द्राक्ष हंगामासाठी परराज्यातून एक हजारहून अधिक व्यापारी जिल्ह्यात यंदा आले होते. दीड लाख एकर क्षेत्रांतून सुमारे दहा लाख टन द्राक्ष परराज्यात यंदाच्या हंगामात पोचली आहे.

Farmers
नाशिक : शेतकरी - विक्रेत्यांमध्ये भाजीबाजारात बाचाबाची

सरासरी दर साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटल

द्राक्ष हंगाम सुरू झाला, की आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढते. चलन उपलब्ध होऊन बाजारपेठेत चैतन्य संचारते. यंदा मात्र द्राक्षाच्या बाजारभावाने निराशा केली आहे. सरासरी तीन हजार रुपये प्रतिक्विंटल दराने द्राक्ष हंगामाचा श्रीगणेशा झाला. उत्तर प्रदेशातील नवरात्रोत्सवामुळे गेल्या महिन्यात दराने चार हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत झेप घेतली. हा कालावधी वगळता हंगामात दर तीन ते साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटलच्या पातळीवर राहिले. उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनी द्राक्षांचे ट्रक पोचण्यात अडथळे आले. तेथील किरकोळ विक्रीला बंधने आली होती. लांबलेली थंडी व अवकाळी पावसाने द्राक्ष हंगामाला दृष्ट लावली. द्राक्षबागाईतदार संघाने शेतकऱ्याच्या बैठकीत निश्चित केलेले महिना निहाय्य ८५ ते ६५ रुपयांच्या दराने सौदे करण्याचा निर्णय बासनात गुंडाळावा लागला. उलट द्राक्षाचे सौदे करण्यासाठी शेतकऱ्यांना व्यापाऱ्याच्या विनवणी कराव्या लागल्या. त्यामुळे द्राक्ष हंगामात शेतकऱ्यांना हवा तेवढा उत्पन्नाचा गोडवा चाखता आला नाही. येत्या दोन दिवसांत द्राक्ष हंगामावर पडदा पडणार आहे. कोल्ड स्टोअर्समध्ये साठविलेल्या द्राक्ष आता बाजारात येतील.

Farmers
राज्यात ‘रोहयो‘चे 415 कोटी 97 लाख रुपयांचा निधी थकीत


''डिझेल दरवाढीमुळे, वाहतूक खर्च वाढल्याने द्राक्षांचे दरावर फटका बसला. डिझेल व टोलच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांप्रमाणेच ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांनाही यंदाचा द्राक्ष हंगाम फारसा लाभदायक ठरला नाही.'' - अरुण लभडे, किरण शेळके (न्यू भगवती ट्रान्स्पोर्ट, पिंपळगाव बसवंत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com