esakal | किसान रेल्वेमुळे रेल्वे प्रशासनाला मिळाला महसूल; शेतकऱ्यांना दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

 Kisan rail departed from devlali

किसान रेल्वेमुळे रेल्वे प्रशासनाला मिळाला महसूल; शेतकऱ्यांना दिलासा

sakal_logo
By
हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : देशात पहिल्यांदाच सुरू करण्यात आलेल्या देवळाली ते मुझ्झफूर किसान रेल्वेमध्ये दोन दिवसांपूर्वी २०७ टन शेतीमाल पाठविण्यात आला. त्यामध्ये नाशिक रोड रेल्वेस्थानकातून तीन बोगींमध्ये पाठविलेल्या ६८ टन मालाचा समावेश होता. त्याद्वारे नाशिक रोड रेल्वे प्रशासनाला दोन लाख ७४ हजारांचा महसूल मिळाला.(Farmers happy due to Kisan Railway)

११२ फेऱ्यांद्वारे १९ हजार टन उत्पादन रवाना

गेल्या सव्वा वर्षापासून देशभरात कोरोना संसर्गामुळे(corona virus) लॉकडाउनसोबत(lockdown) विविध निर्बंध लादण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचा शेतीमाल सर्वत्र पाठविण्यात यावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने देशात प्रथमच देवळाली कॅम्प ते मुझ्झफूर ही किसान रेल्वे ७ ऑगस्ट २०२० ला सुरू केली. दोन दिवसांपूर्वी मुझ्झफूरला गेलेल्या किसान रेल्वेत एकूण २०७ टन शेतीमाल पाठविण्यात आला. त्यामध्ये नाशिक रोड रेल्वेस्थानकातून तीन बोगीतून ६७.७. टन (६७७ क्विंटल) शेतीमाल पाठविण्यात आला. यामध्ये कांदा माल सर्वाधिक होता. तसेच सिमला मिरची, संत्री(Orange), डाळिंब(pomegranate), किव्ही(kiwi) हा मालही पाठविण्यात आला. गेल्या वर्षभरात किसान रेल्वेच्या देवळाली ते मुझ्झफूरदरम्यान ११२ फेऱ्या झाल्या असून, त्याद्वारे १९ हजार ८१ टन शेतीमाल पाठविण्यात आला आहे. नाशिकचा किसान रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळू लागल्याने रेल्वे मंत्रालयाने देशभरातून किसान रेल्वे सुरू केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दाम मिळू लागले आहेत.

हेही वाचा: मान्सूनपूर्वी शेतकऱ्यांच्या नांगरणीला सुरवात; पाहा व्हिडिओ

चक्रीवादळामुळे काही रेल्वे रद्द

गुजरातमध्ये जाणाऱ्या काही रेल्वे गाड्या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन रद्द करण्यात आल्याचे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले. यात ०९२०६ हावडा-पोरबंदर गाडी १५ मेस, ०८४०१ पुरी-ओखा गाडी आणि ०९०९४ संतरागांची-पोरबंदर गाडी १६ मेस, तसेच ०९२३८ राजकोट-रेवा गाडी १७ मेस रद्द करण्यात आली आहे. पुढील गाड्या कमी अंतरापर्यंत (शॉर्ट टर्मिनेट) धावतील. ०२९७४ पुरी-गांधीधाम गाडी १५ मेस अहमदाबादापर्यंत, तर ०६७३३ रामेश्वरम-ओखा गाडी अहमदाबादपर्यंतच धावेल.

हेही वाचा: प्‍लाझ्मा संकलनात ‘ॲन्टीबॉडीज’ कडे सर्रास दुर्लक्ष; परिणामकारकतेवर प्रश्‍नचिन्‍ह

loading image