Nashik Farmer News : राजकीय धूळवडीमध्ये शेतकरी वाऱ्यावर; 547 गावे अन् 1400 वाड्या तहानलेल्या

Farmer News
Farmer Newsesakal

Nashik News : शेतकऱ्यांच्या नावाने ‘घसा’ कोरडा होणाऱ्या राज्यातील राजकीय धूळवडीमध्ये शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आलंय. अगोदर मॉन्सून खोळबंला असताना ‘बिपोरजॉय’ चक्रीवादळाने बाष्प खेचून नेले.

त्यामुळे तळकोकणात मुक्कामी असलेला मॉन्सून सक्रिय होण्यासाठी चक्रीवादळ शमल्यानंतर बाष्प तयार होण्याची प्रतीक्षा करावी लागेल, अशा परिस्थितीत दिलासा देण्यासाठी थेट मदतीची भूमिका कधी घेतली जाणार? याकडे शेतकऱ्यांची नजर लागली आहे.

रोहिणी तसेच मृग नक्षत्र कोरडे गेल्याने राज्यातील खरिपाच्या पेरण्या जेमतेम एक टक्क्याच्या आसपास पोचल्या. कोरड्या क्षेत्रात पेरणी केल्याने स्वाभाविकपणे पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे. (Farmers ignored on in politics 547 villages fourteen hundred mansions thirsty 24 percent stock in dams Nashik News)

हे सारे छोटे शेतकरी असल्याने त्यांच्या मदतीचा विचार सरकारला करावा लागेल. शिवाय रोहिणी अन् मृगाने हुलकावणी दिल्याने मूग, उडीद, ज्वारीच्या सर्वसाधारण नऊ लाख २४ हजार हेक्टरवरील पेरण्यांवर शेतकऱ्यांकडून फुली मारली जाणार आहे. अर्थात, सात लाख टनांहून अधिक उत्पादन शेतकऱ्यांना घेता येणार नाही. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार हे क्षेत्र सोयाबीन, कापूस, तुरीकडे वर्ग होईल.

काही शेतकरी रब्बीच्या ज्वारीसाठी मोकळे ठेवतील. म्हणजेच काय, तर मूग, उडीद, ज्वारीचे उत्पादन घटल्याने बाजारात भाववाढीचे संकट ओढावण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे वरुणराजा प्रसन्न झालेला नसल्याने राज्यातील ५४७ गावे आणि एक हजार ४०४ वाड्यांना ४२६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.

गेल्या आठवड्याच्या तुलनेत ३२ गावे आणि १५८ वाड्यांची तहान वाढल्याने प्रशासनाला ४५ टँकर वाढवावे लागले आहेत.

गेल्या वर्षी जूनच्या मध्याला राज्यातील ५९१ गावे आणि एक हजार ३१२ वाड्यांसाठी ५०१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता. त्यातच राज्यातील मोठ्या १३९, मध्यम २६० आणि लघु दोन हजार ५९० अशा एकूण दोन हजार ९८९ धरणांमधील साठा २४ टक्के उरला आहे. गेल्यावर्षी हाच साठा २७.०८ टक्के होता.

Farmer News
Nashik News : अंबासनच्या कचरा डेपोला आग; ग्रामपंचायत प्रशासनाच्या सतर्कतेने आग आटोक्यात

हवामानशास्त्र अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार मेअखेरीस पक्ष्यांनी घरटी बांधण्यास सुरवात केल्याचे आढळल्याने महिनाभर मॉन्सूनचा खोळंबा होईल, असे संकेत मिळाले होते. कृषी विभागाचे अधिकारी १२ ते १३ जुलैच्या आसपास पेरणीलायक पाऊस होण्याची शक्यता वर्तवित आहे. हवामानशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार जुलै आणि ऑगस्टमध्ये राज्यात चांगला पाऊस अपेक्षित आहे.

राज्यातील खरिपाची स्थिती

० सरासरी क्षेत्र-१४२.०२ लाख हेक्टर आणि उसासह १५२.९७ लाख हेक्टर

० गेल्या वर्षी १५७ लाख हेक्टरवर पेरणी व यंदा १५८ लाख हेक्टरवर पेरणीसाठी प्रयत्न

० मूग, उडीद, ज्वारीची यापुढे पेरणी केल्यास कापणीच्यावेळी पावसाच्या तडाख्यात सापडून नुकसानीची भीती

० भाताची लागवड १६ लाख हेक्टरवर अपेक्षित. ऑक्टोबरमध्ये खाचरात पाणी न राहिल्याने उत्पादनात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत फटका

० विभागनिहाय खरिपाचे क्षेत्र लाख हेक्टरमध्ये : कोकण- ४.१४, नाशिक- २०.६५, पुणे- १०.६५, कोल्हापूर- ७.२८, छत्रपती संभाजीनगर- २०.१९, लातूर- २७.६७, अमरावती- ३२.५९, नागपूर- १९.२५

० यंदाचे पीकनिहाय क्षेत्र लाख हेक्टरमध्ये आणि उत्पादनाचे उद्दिष्ट टनामध्ये असे : तृणधान्ये- ३३.५५-७९.८२, कडधान्ये- २०.५३-१९.५८, गळीत धान्ये-५१.३२-७८.३२, ऊस- ११.२०-१०८६, कापूस- ४१.६८-८५.४७ लाख गाठी

० तुरीचे भाव वधारलेले असताना त्यातून दिलासा मिळण्यासाठी नवीन उत्पादन बाजारात येण्यासाठी होणार विलंब

० कांद्याची खरिपाची लागवड खोळंबणार असल्याने दिवाळीपासून कांद्याचा तुटवडा भरून काढण्याचे प्रश्‍न तयार होतील.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Farmer News
Agri-Tech, Aquaculture संशोधनाला प्रोत्साहनाची गरज | Budget 2022 | पाहा व्हिडीओ

टँकरद्वारे विभागनिहाय पाणीपुरवठा

(गावे, वाड्या आणि टँकरची संख्या)

विभागाचे नाव गावे वाड्या टँकर

कोकण २७० ७७० १५२

नाशिक ९९ १७२ १०२

पुणे १०९ ४४४ ८६

औरंगाबाद ३६ १८ ४९

अमरावती ३३ ० ३७

(सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत टँकर सुरू करावे लागलेत)

धरणांमधील साठा टक्क्यांमध्ये

विभागाचे नाव धरणांची संख्या आजचा साठा गेल्या वर्षीचा साठा

अमरावती २५९ ३६.९९ ३५.२१

औरंगाबाद ९१९ २७.३७ २८.९६

कोकण १७३ ३१.७४ ३५.०५

नागपूर ३८३ ३७.८३ २७.३८

नाशिक ५३५ २५.११ २१.४१

पुणे ७२० १२.७६ १४.४४

(उपलब्ध पाणी, शेती आणि पिण्यासह घरकामासाठी वापरावे लागेल काटकसरीने)

सरकारकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा

० आर्थिक अडचणीवर उपाय म्हणून नमो शेतकरी महासन्मान निधीचे तीन हप्ते मिळावेत

० चाऱ्याची व्यवस्था व्हावी

० शैक्षणिक शुल्कासह प्रवास भाड्यात विद्यार्थ्यांना मिळावी सवलत

० जलसंधारण आणि मृदसंधारणाची कामे ‘सेल्फ’वर आणून ठेवावीत

० विम्यासह पीककर्जाची प्रभावी अंमलबजावणी केली जावी

Farmer News
Agri-Tech, Aquaculture संशोधनाला प्रोत्साहनाची गरज | Budget 2022 | पाहा व्हिडीओ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com