esakal | दिंडोरीतील फुलशेती सलाइनवर! यंदाही हरपला गुलाबाचा टवटवीतपणा
sakal

बोलून बातमी शोधा

Farmers in financial difficulties due to corona

दिंडोरीतील फुलशेती सलाइनवर! यंदाही हरपला गुलाबाचा टवटवीतपणा

sakal_logo
By
संदीप मोगल

लखमापूर (जि. नाशिक) : नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाची दुसरी लाट भयानक स्वरूप धारण करीत असल्यामुळे यंदाही फुलशेती, फळशेती करणाऱ्या बळीराजांच्या आर्थिक पुंजीचा कणाच मोडला आहे.

उत्पन्नाअभावी कर्जफेडीची चिंता

दिंडोरी तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यातील शेतकरी आपल्या शेतात प्रत्येक हंगामात नवनवीन प्रयोग करून आर्थिक बळ कसे निर्माण होईल, यावर भर देत असतो. त्यासाठी विविध फळभाज्या, फुलशेती घेण्याकडे कल असतो. कोकणगाव खुर्द येथील शिवाजी शेळके यांनी आपल्या एक एकर शेतात गुलाब शेतीचे पॉलिहाउस तयार केले. कोरोना नव्हता, तोपर्यंत गुलाब शेतीतून बऱ्यापैकी आर्थिक आवक येत होती. त्यामुळे विविध ठिकाणच्या बँकेचे जे भांडवल म्हणून कर्ज घेतले होते. ते फेडण्यासाठी कुठल्याही स्वरूपाची अडचण येत नव्हती. परंतु, गेल्या हंगामापासून कोरोना वातावरणातील बदलाव, अवकाळी पाऊस या अस्मानी संकटामुळे फुलशेतीचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. त्यामुळे विविध ठिकाणाहून घेतलेले कर्ज कसे फेडावे व संसाराचा गाडा कसा ओढायचा, असा प्रश्‍न बळीराजासमोर आहे.

बळीराजाचे अश्रू पुसायला कोणी येईल का?

बळीराजांची यंदाची स्थितीही सलाइनवरच आहे. दिंडोरी तालुक्यातील शेतकरी तीन ते चार वर्षांपासून उत्पन्नांच्या बाबतीत चारी मुंड्या चित झाल्याने बळीराजाच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी कोणी पुढे येईल का, या विवंचनेत शेतकरी आहे.

हेही वाचा: रुग्ण अन् नातेवाइकांचा तो टाहो.. घटनेची आठवण होताच अजूनही चुकतो काळजाचा ठोका..

...म्हणून फुले कोणी घेईना

कोरोनाची दुसरी लाट भयानक असल्याने पुन्हा एकदा धार्मिक कार्यक्रम, मंदिरे, विविध धार्मिक विधी शासन आदेशानुसार बंद ठेवण्यात आल्याने फुलांची खरेदी कोणी करीत नाही. त्यामुळे लाखो रुपयांची टवटवीत फुले फेकून देण्याची वेळ आली आहे. खर्च भरपूर व उत्पन्न काहीच नाही, अशी स्थिती आहे.

''फुलशेती आता शेतकरी वर्गासाठी आव्हान ठरत आहे. आम्ही लाखो रुपये खर्च करूनही हातात काहीच उत्पन्न आले नाही. फुलशेतीच्या भरवशावर लाखो रुपये कर्जाचे ओझे येऊन पडले आहे. वसुलीसाठी बँकांचा तगादा असल्यामुळे आमच्या तोंडाचे पाणी पळाले आहे.''

- शिवाजी शेळके, गुलाब शेती उत्पादक, कोकणगाव खुर्द, ता. दिंडोरी

हेही वाचा: संचारबंदीने आधीच हतबल, त्यात पाण्यावाचून तडफड..महिलांचा टाहो

loading image