esakal | रुग्ण अन् नातेवाइकांचा तो टाहो.. घटनेची आठवण होताच अजूनही उडतो काळजाचा ठोका.

बोलून बातमी शोधा

nashik oxygen leak

रुग्ण अन् नातेवाइकांचा तो टाहो.. घटनेची आठवण होताच अजूनही चुकतो काळजाचा ठोका..

sakal_logo
By
युनूस शेख

नाशिक : रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचा टाहो... डॉक्टर कर्मचाऱ्यांची धावपळ... रुग्णांना वाचविण्यासाठी खटाटोप... रुग्णांच्या छातीवर पंप करून, तसेच अन्य रुग्णालयातून ऑक्सिजन टाक्या मागून रुग्णांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न..सगळं काही आठवलं की काळजाचा ठोका चुकतो...

डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयांमध्ये बुधवारी (ता. २१) ऑक्सिजन टॅंकला गळती लागून २४ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. बुधवारी (ता. २८) घटनेस आठ दिवस उलटले आहे. तरीदेखील घटनेची आठवण काळजाचा ठोका उडवून जात असल्याच्या प्रतिक्रिया रुग्णालय कर्मचारी, परिसरातील नागरिकांनी दिल्या.

हेही वाचा: डॉक्टर म्हणताहेत..!"नाशिक-नगरची झंझट नको, आम्हाला ऑक्सिजन द्या"

डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटच्या मुख्य ऑक्सिजन टॅंकला गळती लागून २२ जणांचा मृत्यू झाला होता. दाखल रुग्णांची तब्येत अस्तवस्त झाली. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनी टाहो फोडला. डॉक्टर कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. रुग्णांना वाचविण्यासाठी खटाटोप सुरू झाला. रुग्णांच्या छातीवर पंप करून, तसेच अन्य रुग्णालयातून ऑक्सिजन टाक्या मागून रुग्णांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु प्रयत्न अयशस्वी होऊन २४ जणांचा मृत्यू झाला. मृताच्या नातेवाइकांनी आक्रोश केला. यादरम्यान नातेवाइकांच्या किंकाळ्या आणि रुग्णवाहिकांच्या आवाजाने रुग्णालय परिसर दणाणून गेला.

हेही वाचा: होम क्वारंटाईन कोरोनाबाधितांसाठी ‘आयएमए’तर्फे ‘नाशिक कोविड हेल्पलाइन’

नाशिककरांसाठी तो दिवस काळा दिवस ठरला. आईला मुलाचे शेवटचे दर्शन घेता आले नाही. अशा या घटनेने सारेच सुन्न झाले होते. घटनेस एक हप्ता उलटला, तरीदेखील डॉक्टर, कर्मचारी, तसेच नागरिकांच्या कानात अजूनही त्या घटनेचा आवाज आणि डोळ्यांसमोर घटनेतील प्रसंग येत असल्याने मन हेलावून जात आहे. दुसरीकडे आज रुग्णालय, तसेच परिसरात दिवसभर गेल्या बुधवारी घडलेल्या घटनेची चर्चा सुरू होती. आयुष्यभर लक्षात राहील अशी घटना घडल्याच्या प्रतिक्रिया यावेळी अनेकांकडून देण्यात आल्या.

"गेल्या बुधवारी घडलेली घटना अतिशय दुर्दैवी होती. आजही त्या घटनेची आठवण होताच अंगावर शहारे येतात. मृत २४ जणांच्या कुटुंबीयांची काय परिस्थिती असेल, याची कल्पनादेखील करवत नाही. अशी घटना पुन्हा होऊ नये, यासाठी महापालिका व जिल्हा प्रशासनाने काळजी घ्यावी".-झुबेर हाश्मी, सदस्य, जिल्हा रुग्णालय समिती