साल्हेर भागात कैऱ्या उतरविण्याची शेतकऱ्यांची लगबग

farmers climb on trees to cut down raw mangoes
farmers climb on trees to cut down raw mangoesesakal

साल्हेर (जि. नाशिक) : बागणाणच्या पश्‍चिम आदिवासी (Tribal) पट्ट्यातील साल्हेर, मानुर, बिंद्रावन, मोराळा, बारीपाडा, साळवण, सावरपाडा, भाटांबा, बंधारपाडा, पायरपाडा, भिकारसौडा, महादर मोठे, महादर, वाघंबा आदी गावातील शेतकरी (Farmer) आपापल्या शेतामध्ये कैरी (Raw Mangoes) उतरविताना दिसत आहे. (Farmers in salher area are cutting raw mangoes to make kochari pickle Nashik News)

farmers climb on trees to cut down raw mangoes
जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या बदल्या; कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी

सुरवातीपासूनच आंब्याला मोहोर मोठ्या प्रमाणात आला होता. मात्र, या भागात बेमोसमी पावसामुळे मोहोर गळून पडला होता. तरीदेखील कैरीचा बहार मोठ्या प्रमाणात आला होता. मात्र, गेल्या पंधरवड्यात वादळी वाऱ्यामुळे हैदोस घातल्याने कैऱ्या मोठ्या प्रमाणात पडल्या. कैऱ्यांपासून कोचरी बनवून बाजारात विक्रीसाठी शेतकरी नेत आहे. येत्या चार- पाच दिवसात पावसाचा अंदाज असल्यामुळे शेतकऱ्यांची आंबा उतरविण्याची लगबग सुरू आहे. त्या मोबदल्यात दोन पैसे मिळतील व बी- बियाणे खत, खाद्य घेता येईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. प्रत्येक घरात लोणचे बनविण्याची लगबग सुरू आहे.

farmers climb on trees to cut down raw mangoes
6 महिन्यांपासून वडाळा चौफुली रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com