6 महिन्यांपासून वडाळा चौफुली रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत

road of indiranagar
road of indiranagaresakal

इंदिरानगर (जि. नाशिक) : तब्बल सहा महिन्यांपूर्वी वडाळा गाव चौफुली ते शिवाजीवाडी जवळ असलेल्या नासर्डी नदी पुलापर्यंतचा रस्ता भुयारी गटार योजनेच्या (Underground sewer scheme) कामासाठी खोदकाम करून ठेवला. कामदेखील पूर्ण झाले, मात्र डांबरीकरण (Asphalting) पूर्ण न केल्याने या पावसाळ्यात वडाळ्यासह आसपासच्या नागरिकांची या चिखलयुक्त रस्त्यावर तारांबळ उडणार आहे. (Wadala Chaufuli road has been waiting for asphalting for 6 months Nashik News)

तातडीने या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे (Nationalist Students Congress) अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हा रस्ता जेएमसीटी महाविद्यालय आणि वडाळा गाव यांचा प्रमुख वहिवाटीचा रस्ता आहे. वडाळा गावातील हातावर काम करणारे सायकल आणि रिक्षाच्या साह्याने येथून प्रवास करतात. या गावात अजून शहर बससेवादेखील सुरू झालेली नाही. त्यात सहा महिन्यांपासून हे डांबरीकरण रखडल्याने सर्व नागरिकांना धुळीतून प्रवास करत करावा लागत आहे. अनेकांना डोळ्यांचे विकारदेखील यामुळे झाले आहेत.

road of indiranagar
विवाहाच्या आमिषाने महिलेला 62 लाखांचा गंडा; एकावर गुन्हा

मात्र, प्रशासनाकडून याबाबत डोळेझाक होत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर मोठे खड्डे पडून चिखल पसरण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. तसे झाले तर मात्र येथून चालणेदेखील मुश्कील होणार आहे. या सर्व बाबींचा विचार करून प्रशासनाने तातडीने हे डांबरीकरण करण्याची मागणी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव शदाब सय्यद शहर उपाध्यक्ष रमीज पठाण, शेहबाज काजी, संकेत गायकवाड आदींनी केली आहे.

road of indiranagar
जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या बदल्या; कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com