सोनांब्याच्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला; गुरदरी पाझर तलाव फुटण्याचा धोका

Ground report of cloudburst at sinnar
Ground report of cloudburst at sinnar esakal

नाशिक : सिन्नर तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यातील सोनांबे येथे गुरुवारी (ता. १) सायंकाळी दोन तासांत १४४ मिलिमीटर पाऊस झाला. ढगफुटीने सगळीकडे पाणीच पाणी झाल्याने गावाच्या दक्षिणेला असलेला गुरदरी पाझरी तलाव काही वेळात तुडुंब भरला.

तलावाच्या मुख्य सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग होऊन नाल्यावरील तीन बंधारे फुटले. त्यातच तलावाच्या मागील बाजूस भरावावरून विसर्ग होऊन १५ ते २० फुटांचा भराव खचला आहे. (Farmers of Sonambe in Risk of bursting of Gurdari Pazar Talav Nashik Latest Marathi News)

तलावाचा भराव तीन फूट शिल्लक आहे. त्यासही तडे गेल्याने तलाव फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेकडो एकरांवरील पिके वाहून जाण्यासह जीवितहानी होण्याचा धोका बळावला आहे. त्यामुळे सोनांब्याच्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. पावसाने उघडीप देऊन तीन दिवस झालेले असताना पाझर तलावाच्यावरील भागातील डोंगर भागातून पाण्याची मोठी आवक तलावात होत आहे.

यापूर्वीच्या पूरपाण्यामुळे गावातील तीन तलाव फुटल्याने कोबी, टोमॅटो, वाटाणा, गाजर अशी पिके वाहून गेली. सात ते आठ विहिरी वाहून आलेल्या मातीमुळे बुजून गेल्या आहेत. नाल्यालगतचे छोटे पूल वाहून गेल्याने शेतकऱ्यांचा संपर्क तुटला आहे. अशा भीषण परिस्थितीत तलाव फुटल्यास मोठा प्रलय होऊ शकतो.

तलावाच्या खालील भागात मोठ्या प्रमाणावर द्राक्षे, टोमॅटो, कोबी, वाटाणा, गाजर व खरीप कांदा रोपवाटिका आहेत. तलाव फुटल्यास शेकडो एकर क्षेत्र वाहून जाऊ शकते. शिवाय मोठी जीवितहानीसुद्धा घडू शकते, अशी भीती महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक नंदू पाटील पवार यांनी व्यक्त केली.

Ground report of cloudburst at sinnar
Ganeshotsav 2022 : राणेनगरच्या Unique गणेश महोत्सवाला तुफान गर्दी

शेतकऱ्यांमध्ये संताप

गुरदरी पाझर तलावाचे बांधकाम १९७२ मध्ये झाले. त्यानंतर सरकारी यंत्रणेने अद्यापपर्यंत इथल्या स्थितीची पाहणी अथवा परीक्षण केलेले नाही, असे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा संताप शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

"पाझर तलावाचा एक कोपरा फुटल्याने तलावापासून खालील दोन किलोमीटरवर अंतरावर माझ्या शेतात गुडघाभर पाणी वाहत होते. त्यात कोबी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. आता तलावाचा मागील बाजूचा भराव फुटल्यास शेतकऱ्यांचे काहीही शिल्लक राहणार नाही. शिवाय मोठा अनर्थ घडू शकतो." - रमेश पवार, शेतकरी, सोनांबे

"ज्या दिवशी मोठी अतिवृष्टी झाली, त्या दिवशी बंधाऱ्याच्या मागील बाजूस सांडव्यावरून पाणी वाहत होते. त्याच दिवशी प्रशासनाला कळविण्यात आले. अधिकाऱ्यांनी येऊन केवळ पाहणी केली. मात्र अद्यापपर्यंत काही कृती झालेली नाही. त्यामुळे अनर्थ घडल्यास त्यास सरकारी यंत्रणा जबाबदार राहील. अगोदरच आम्हाला मोठा फटका बसलेला आहे, याकडे तातडीने गांभीर्याने पाहावे." -लक्ष्मण पवार, शेतकरी, सोनांबे

Ground report of cloudburst at sinnar
Nashik : पंचवटी विभागात NMCकडून 341 मूर्ती संकलन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com