कर्जमाफीसाठी शेतकरी संघटनेचा शासनाला अल्टिमेटम; शासनाविरोधात 14 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा | Farmers organization ultimatum to government for loan waiver March against government on June 14 at NDCC collectors office Nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Protest

NDCC : कर्जमाफीसाठी शेतकरी संघटनेचा शासनाला अल्टिमेटम; शासनाविरोधात 14 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Nashik News : सक्तीची वसुली बंद करून शासनाने कर्जमुक्त करावे, या मागणीकरिता सुरू असलेल्या आंदोलनाचे दखल घेतली जात नसल्याने आक्रमक झालेल्या संघटनेने १३ जूनचा शासनाला अल्टिमेटम दिला आहे.

१३ जूनपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास १४ जून रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा सहनिबंधक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष सुधाकर मोगल, शेतकरी संघटनेचे भगवान बोराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Farmers organization ultimatum to government for loan waiver March against government on June 14 at NDCC collectors office Nashik news)

जिल्हा बॅंकेकडून सुरू असलेली सक्तीची वसुली बंद करून शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांना राज्य शासनाने कर्जमुक्त करावे, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष संघटना व शेतकरी संघटना समन्वय समितीच्या यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालयासमोर उपोषण आंदोलन सुरू आहे.

चार दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या जिल्हा बॅक प्रशासनाव्यातिरिक्त शासनाने दखल घेतलेली नाही. पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरावर १६ जानेवारी रोजी बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला होता.

त्यावेळी आमच्या मागण्यांचे निवेदन सादर केले होते. परंतू, सहा महिने उलटूनही अद्याप कारवाई झालेली नाही. बॅंकेचे संचालक मंडळ तसेच श्रीमंत शेतकरी यांची वसुली आधी करा, मगच शेतकऱ्यांची करा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी विविध शेतकरी संघटनांकडून संघर्ष सुरू केला आहे.

जिल्हा बँकेच्या थकीत कर्जाच्या नोटिसा गोदावरी नदी पात्रात बुडवून सुरू केलेले आंदोलन, धरणे उपोषण यापूर्वी केले आहे. आता एक जूनपासून उपोषण आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला जिल्ह्यातील शेतकरी पाठिंबा देत असले तरी शासनाच्या वतीने अद्याप कोणीही भेटायला आलेले नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आदिवासी संघर्ष समिती या संघटनेच्या वतीने राज्याध्यक्ष कैलास बोरसे यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला आहे, यामुळे आंदोलनाची व्याप्ती वाढली आहे. आंदोलनात सर्वच शेतकरी संघटना सामील होण्याची शक्यता आहे.

लवकरच प्रहार शेतकरी संघटन संघटना व मनसे सहभागी होऊन आंदोलन तीव्र होऊन ते नाशिक पुरते मर्यादित न राहता आंदोलनाचे लोन राज्यभरातील १७ जिल्हा मध्यवर्ती बँकापर्यंत जाऊन धडकेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

तसेच कर्ज माफ करण्यात यावे, यासाठी १०० रुपयांच्या स्टँपवर लिहून देणार असल्याचेही बोराडे यांनी सांगितले. आंदोलनात शेतकरी संघटनेचे सुधाकर मोगल, भगवान बोराडे, कैलास बोरसे, दिलीप पाटील, नाना पाटील आहेर, दगाजी अहिरे,

रमेश अहिरे, रावसाहेब ऐतवाडे, रामराव मोरे, बाळासाहेब भंडारे, भाऊसाहेब भंडारे, रामनाथ भंडारे, दत्तात्रय सुडके, सुनील देवरे, नंदकुमार देवरे, चिंधू पाटीलपगार, मच्छिंद्र जाधव, खंडेराव पाटील, नवनाथ गावले आणि नामदेव पवार आदी शेतकरी सहभागी झाले आहेत.