काय सांगता! लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांच्या खिशात 400 कोटी

lockdown farmer
lockdown farmeresakal

येवला (जि.नाशिक) : नेहमीच बेभरवशाच्या ठरणाऱ्या कांद्याने लॉकडाउनच्या साडेसातीत या वर्षी शेतकऱ्यांना भरभरून दिले आहे. वर्षभरात शेतकऱ्यांच्या खिशात तब्बल ४०० कोटी रुपयांचे चलन कांदा पिकाने दिले आहे. (farmers-profit-400-crore-in-during-lockdown-nashik-marathi-news)

प्रयोगशील शेतकऱ्यांची जिद्दीने मात

बाजारपेठेतील मागणी, पुरवठ्यातील तफावत आणि निसर्गाने बदललेले राज्याराज्यांतील समीकरण यामुळे जिल्ह्यातील कांद्याला देशात सर्वत्र मागणी असल्याने बाजारभाव टिकून राहिले. चांदवड, येवला, निफाड, कळवण, सटाणा हे सर्वाधिक कांदा उत्पादक तालुके आहेत. अर्थात, लाल व रब्बी रांगड्या कांद्याच्या बाबतीत मात्र येवल्याची बाजारपेठ पूर्वीपासून टॉपला असून, येथील शेतकऱ्यांना अनेक पर्याय मिळालेले असतानादेखील कांद्यावरील प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. मंदीच्या काळात अगदी १०० ते २०० रुपयाने देखील कांदा विक्रीची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने भांडवलही अनेकदा निघाले नाही. तरीही कांद्यावरील प्रेम वाढतच जाऊन दर वर्षी क्षेत्र वाढत आहे. दोन वर्षांपूर्वी उन्हाळ कांद्याला मागणी वाढल्याने भावही तेजीत होते. गेल्या वर्षीच्या उन्हाळ कांद्याला सरतेशेवटी भाव घसरले. पण, बाजारपेठेचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली. वर्षभरात रोगाचा प्रादुर्भाव आणि कांदा बियाण्यातील फसवणूक, पावसामुळे सडलेली रोपे अशा अनेक आपत्तींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. मात्र, त्यावरही प्रयोगशील शेतकऱ्यांनी जिद्दीने मात करत कांद्याचे अधिक उत्पादन घेतले आहे. बाजारभावात चढ-उतार असले तरी सरासरी भाव समाधानकारक मिळाल्याने शेतकऱ्यांना नफा झालेला आहे.

lockdown farmer
नाशिकचा उन्हाळ कांदा खाणार सलग तिसऱ्या वर्षी ‘भाव'!

मोठा तोटा सहन केला

भाववाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी अनेक दिवस चाळीत उन्हाळ कांदा ठेवल्याने सुरवातीला विक्री केलेले शेतकरी नफ्यात पहिले तर ज्यांनी ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत कांदा चाळीत ठेवला, त्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. या काळात कांद्याला ३०० ते सात हजार ५०० रुपयापर्यंत भाव मिळाला, तर नोव्हेंबरच्या शेवटी लाल कांदा विक्रीला आला. लाल कांद्याची आवक डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात वाढीला लागली. मात्र, दर वर्षीच्या तुलनेत ट्रॅक्टरभर नव्हे, तर थोडा-थोडा कांदा शेतकऱ्यांना विकावा लागला.

खरीप हंगामात लाल कांद्याच्या लागवडीचीही तयारी

शेतकऱ्यांनी घेतलेल्या पोळ कांद्याला भाव मिळाल्याने रब्बी रांगडा कांद्याची लागवड वाढली होती. सर्वाधिक प्रमाणात डिसेंबर-जानेवारीमध्ये निघाला. नंतर उन्हाळही बाजारात आल्याने एप्रिल २०२१ पर्यंत येवला व अंदरसूलला तब्बल ३० लाख क्विंटल कांदा विक्री झाली. वर्षभरात बाजारभावदेखील चांगले मिळाले. उन्हाळ कांद्याला ३०० ते साडेसात (सरासरी १४५०) तर, लाल कांद्याला २०० ते चार हजार १९१ (सरासरी एक हजार ३००) रुपये दर मिळाला. सध्या उन्हाळ कांद्याला काहीसा कमी भाव मिळत असल्याने अनेकांनी कांदा चाळीत साठवला आहे. तर खरीप हंगामात लाल कांद्याच्या लागवडीचीही तयारी शेतकरी आताच करत आहे.

एप्रिलमध्ये विक्रमी आवक...

मार्चमध्ये बाजार समित्या बंद असल्याने गेल्या महिन्यात एप्रिलमध्ये येथील बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीला आला होता. महिन्यात येवल्यात दोन लाख ३५ हजार क्विंटल, तर अंदरसूलला एक लाख २७ हजार क्विंटल आवक होऊन ९०० ते एक हजार ५०० (सरासरी ९६०) भाव मिळाला. तर २८ कोटी ५५ लाखांची उलाढाल झाली. सध्या मेमध्ये ३०० ते एक हजार ८५१ (सरासरी १६००) भाव मिळत आहे.

lockdown farmer
'ते' लग्न इगतपुरीच्या रिसॉर्टला पडले महागात!

काय म्हणतात शेतकरी?

शेतातच लाल कांदे खराब झाल्याने घटलेले उत्पादन, वाढलेली मागणी शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरली आहे. शेतकऱ्यांनी या हंगामातील प्रतिकूल स्थितीतही कांदा लागवड केल्याने त्याचे दोन पैसे मिळाले. गेल्या वर्षी लागवड झालेला कांदा खराब झाला. तसेच, बियाण्यांत मोठी फसवणूक झाल्याने नुकसान काही प्रमाणात भरून निघणे शक्‍य झाले. - वसंतराव पवार, मुख्य प्रशासक, बाजार समिती, येवला

गेल्या वर्षी शेवटी उन्हाळ कांद्याचे दर घसरल्याने मोठे नुकसान झाले. मात्र, कोरोनानंतरच्या कालखंडात लाल कांद्याची मागणी वाढल्याने भावही टिकून राहिले. अनेक शेतकऱ्यांना दोन ते तीन हजारांचे दर मिळाल्यामुळे काहीसा आधार मिळाला होता. आता उन्हाळ कांद्याला सरासरी एक हजार ६०० रुपये दर मिळत आहे. - कैलास व्यापारे, सचिव, बाजार समिती

lockdown farmer
नाशिकच्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना औरंगाबादला हलविण्याची नाचक्की

एप्रिल २०२० ते मार्च २०२१ दरम्यान

अशी झाली कांदाविक्री (आकडे क्विंटलमध्ये)

येवला आवार

- उन्हाळ कांदा - ३०० ते ७५०० (सरासरी १४५०)

- लाल कांदा - २०० ते ४१९१ (सरासरी १३००)

- आवक - १६ लाख ७७ हजार

- उलाढाल - २६२ कोटी

अंदरसूल उपआवार

- उन्हाळ कांदा - ३०० ते ८२५० (सरासरी १५००)

- लाल कांदा - ३०० ते ४३६६ (सरासरी १४००)

- आवक - ९ लाख ३ हजार

- उलाढाल - १४० कोटी

B03526

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com