Farmers Protest
sakal
सिन्नर: कांद्याला प्रतिक्विंटल तीन हजार रुपयांचा हमीभाव, तर यापूर्वी विक्री केलेल्या कांद्यास प्रतिक्विंटल एक हजार ५०० रुपयांचे अनुदान देण्याची मागणी करणारा ठराव करण्यात आला. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव, जोगलटेंभी येथील ग्रामसभांत ठराव करण्यात आले.