esakal | पदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका!...कसा ते वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

pune university.jpg

यापूर्वी शैक्षणिक वर्ष 2010-11 मध्ये विद्यापीठातर्फे शुल्कवाढ करण्यात आली होती. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात शुल्कवाढीसंदर्भात चर्चा झाली; परंतु दुष्काळ व अन्य कारणांमुळे शुल्कवाढीचा निर्णय बारगळला होता. मध्यंतरीच्या काळात किरकोळ स्वरूपात शुल्कवाढ झाली असली तरी, व्यापक स्वरूपात शुल्कवाढीचा निर्णय तब्बल दहा वर्षांनी झाला असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. 

पदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका!...कसा ते वाचा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्‍चितीसाठी यंदा खिसा हलका करावा लागणार आहे. विद्यापीठाने यासंदर्भातील सूचना जारी केली आहे. 

ट्युशन फी, डेव्हपलमेंट फी, लॅब्रोटरी फी व अन्य प्रकारचे शुल्क

माजी कुलगुरू डॉ. एस. एस. माळी यांच्या अध्यक्षतेखाली शुल्क निश्‍चितीसाठी नेमण्यात आलेल्या समितीने सुचविलेल्या शुल्क रचनेला विद्यापीठाच्या 13 फेब्रुवारीला झालेल्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून सुधारित शुल्क भरल्यावर विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चित करता येणार आहे. यासंदर्भात जारी परिपत्रकात ट्युशन फी, डेव्हपलमेंट फी, लॅब्रोटरी फी व अन्य प्रकारचे शुल्क निश्‍चित करण्यात आले आहे. यात विद्यापीठ प्रांगणात चालविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांसह विद्यापीठाशी संलग्न पुणे, नाशिक व नगर जिल्ह्यांतील अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांकरिता ही शुल्क रचना आहे. दरम्यान, अनुदानित अभ्यासक्रमां च्या शुल्कात फारशी वाढ झालेली नसली, तरी विनाअनुदानित व प्रचलित अशा काही अभ्यासक्रमांच्या शुल्कात थेट दुपटीहून अधिक वाढ झालेली असल्याने सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तारेवरची कसरत करावी लागण्याची भीती व्यक्‍त होत आहे. 
 
तब्बल दहा वर्षांनंतर शुल्कवाढ
 
यापूर्वी शैक्षणिक वर्ष 2010-11 मध्ये विद्यापीठातर्फे शुल्कवाढ करण्यात आली होती. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात शुल्कवाढीसंदर्भात चर्चा झाली; परंतु दुष्काळ व अन्य कारणांमुळे शुल्कवाढीचा निर्णय बारगळला होता. मध्यंतरीच्या काळात किरकोळ स्वरूपात शुल्कवाढ झाली असली तरी, व्यापक स्वरूपात शुल्कवाढीचा निर्णय तब्बल दहा वर्षांनी झाला असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. 

हेही वाचा > 'या' गावचे शेतकरी पुन्हा डाळींबाच्या प्रेमात...!

अभ्यासक्रमनिहाय वाढीव शुल्क 

कला शाखेतील सर्व विषयांत पदव्युत्तर (एम. ए.) अभ्यासक्रमांसाठी अनुदानितला यापूर्वी एक हजार रुपये शुल्क (ट्यूशन फी) असताना आता तेराशे रुपये भरावे लागतील. विनाअनुदानित महाविद्यालयांत पदवी (बीए) अभ्यासक्रमासाठी पूर्वीचे तीन हजार 900 रुपये शुल्क आता आठ हजार रुपये केले आहे. विनाअनुदानित एम.ए.साठी पाच हजार 200 रुपये शुल्क होते. ते आता दहा हजार रुपये झाले आहे. विज्ञान शाखेतील बी. एस्सी. अभ्यासक्रमासाठी अनुदानित महाविद्यालयांत 800 ऐवजी एक हजार 50 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. विनाअनुदानित एम. एस्सी. करिता दहा हजार 400 शुल्काऐवजी आता 13 हजार 500 रुपये झाले आहे. वाणिज्य शाखेतील बी. कॉम. (अनुदानित) करिता यापूर्वी आठशे रुपये ट्यूशन फी, तर 40 रुपये लॅबरोटरी फी होती. आता बाराशे रुपये ट्यूशन फी तर, दीडशे रुपये लॅबरोटरी फी अदा करावी लागेल. 

लॅबरोटरी फी दोन हजार 300 ऐवजी तीन हजार 

विनाअनुदानित बी. कॉम. अभ्यासक्रमासाठीचे शुल्क तीन हजार 900 रुपयांवरून थेट नऊ हजार रुपये केले आहे. विनाअनुदानित एम. कॉम. अभ्यासक्रमासाठी पाच हजार 200 ऐवजी आता 14 हजार रुपये शुल्क झाले आहे. तर अनुदानित अभ्यासक्रमासाठी आठशेऐवजी एक हजार 50 रुपये अदा करावे लागेल. विनाअनुदानित बी. एस्सी. करिता पाच हजार 200 ऐवजी आता सहा हजार 750 शुल्क अदा करावे लागेल. बीसीए (विज्ञान) करिता पूर्वी दहा हजार रुपये शुल्क होते. ते आता 16 हजार 500 झाले आहे. बीबीए अभ्यासक्रमासाठीच्या 14 हजार 300 ट्यूशन फीमध्ये सुधारणा केल्याने आता 18 हजार 600 रुपये आकारले जातील. तर लॅबरोटरी फी दोन हजार 300 ऐवजी तीन हजार केली आहे. जिमखाना शुल्क पूर्वी शंभर रुपये होते, ते आता अडीचशे रुपये आकारले जाणार आहे.  

हेही वाचा > रात्रीस खेळ चाले!...रात्री ट्रॅक्‍टर तर दिवसा बैलगाडीने होताय हे धंदे...

loading image