पौरोहित्‍यातही महिलाराज : मंत्रोच्‍चार, सुक्‍तपठणातून आरोग्‍यसाध्‍यता

female priest aparna chindhade
female priest aparna chindhadeesakal
Updated on

नाशिक : मनःशांती, सकारात्‍मक ता हे सारे पौरोहित्‍यातून मिळाले तसेच याचा आरोग्‍यावर योग्‍य परिणाम झाला, असे अपर्णा चिंधडे यांनी ‘सकाळ’ शी संवाद साधताना त्‍यांच्या पौरोहित्‍याच्या प्रवासाविषयी अनुभव मांडले.

अपर्णा चिंधडे यांचे माहेर पुण्याचे, सासर नाशिक इंदिरानगर येथील. मनःशांतीसाठी यासाठी शेजारच्या काकूंनी विष्णुसहस्रनाम पठण करण्याविषयी सुचविले असता, शास्त्रशुद्ध पद्धतीने हे शिकून घेण्याचे ठरविले व वयाच्या चाळीशीनंतर म्‍हणजेच २०११ मध्ये त्‍यांनी जयश्री कुलकर्णी यांच्याकडे पौरोहित्‍य वर्गात प्रवेश घेतला. (Female rule in Priesthood aparna chindhade nashik latest marathi news)

female priest aparna chindhade
Ganeshotsav 2022 : शहराच्या विविध भागात गणेशमूर्तींचे स्टॉल सजले

यानंतर ५ वर्ष राणी भवन येथे शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी त्‍यांनी श्रीमती दुगल आणि साने गुरुजींचे मार्गदर्शन मिळाले. पौरोहित्य शिकताना त्यांना जाणवले, की आपल्याही नकळत विचारांमध्ये एक प्रकारची सकारात्मकता येते. स्वभावात खूप पालट होतो. मन आणि स्वभाव शांत होतो.

स्वरांसहित शास्त्रोक्त आणि शुद्ध सुक्तपठण करताना आपल्या शरीरावरदेखील चांगला परिणाम दिसून येतो. सुक्तपठण हा एक प्रकारचा प्राणायामच आहे. त्यामुळे जेवढे शास्त्रशुद्ध पठण होईल, तेवढा चांगला परिणाम दिसून येतो. तसेच, त्यांना घरातून पूर्णपणे पाठिंबा मिळाला. मुलांवर या साऱ्याचा सकारात्‍मक परिणाम झाला.

वातावरण शुद्धी, प्रसन्नता आपोआप येते. पौरोहित्‍य करताना यजमानांची मिळणारी सकारात्‍मक व समाधानाची पावती यामुळे मन आनंदी होते. नित्‍य पठणाने येणारी अनुभूती छान असते, तसेच समस्‍येवरही उपाय यामुळे सहजरित्‍या गवसतात. भगवंत हा आपल्‍यातच आहे, फक्‍त त्‍याला ओळखून आर्ततेने हाक दिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. त्‍यांच्या भागातील महिलांचे ते वर्गही घेतात.

female priest aparna chindhade
Degree Admission : बारावीनंतरच्‍या पदविकेच्‍या प्रवेशाची प्रक्रिया लांबली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

What caused traffic congestion at Dwarka Chowk?
Declining rainy days impact on Nashik agriculture
Onion Purchase Irregularities Worth ₹54 Crore Surface; Investigation Demand Grows
BJP Corporator-Engineer Dispute Creates Stir in Nashik; Staff Announce Protest
Marathi News Esakal
www.esakal.com