esakal | क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची
sakal

बोलून बातमी शोधा

rupali chaudhari.jpg

कुटुंबियांसोबतचा तो प्रवास रुपाली यांचा शेवटचाच ठरला. कुणाच्या ध्यानी मनी नसतांना काळाने अशी झडप घालती की हसतं - खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं. तो एक मोह सेल्फीचा अन् माऊली लेकरांपासून दुरावली. घटनेने संपूर्ण गावावर शोककळाच. वाचा काय घडले?

क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : कुटुंबियांसोबतचा तो प्रवास रुपाली यांचा शेवटचाच ठरला. कुणाच्या ध्यानी मनी नसतांना काळाने अशी झडप घालती की हसतं - खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं. तो एक मोह सेल्फीचा अन् माऊली लेकरांपासून दुरावली. घटनेने संपूर्ण गावावर शोककळाच. वाचा काय घडले?

अशी आहे घटना

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव परिसरात ब्रह्मगिरीपासून २० कि.मी. अंतरावर वसलेला हरिहरगड ऊर्फ हर्ष किल्ला तेथे दुर्गभ्रमंती करण्याचा मोह भल्या भल्यांना होतो. नाशिक तालुक्यातील राजूर बहुला येथील रूपाली ज्ञानेश्वर चौधरी (३५) ही महिला आपल्या कुटुंबियांसह दुर्गभ्रमंतीसाठी आली होती. रूपाली या आपल्या कुटुंबासोबत खासगी वाहनाने आल्या होत्या. त्यांनी निरगुडपाड्याच्या बाजूने हरिहर किल्ल्यावर चढण्याची सुरुवात केली. किल्ल्यावर जात असताना एका ठिकाणावर फोटो काढत असताना रूपाली यांचा पाय घसरला आणि दगडावर आदळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेने कुटुंबियांना धक्काच बसला. हे वृत्त समजताच किल्ल्याच्या परिसरात असलेले वनरक्षक दिवे आणि कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

हरिहर किल्ला गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. चढाई करण्यास अतिशय कठीण मानला जाणाऱ्या हरिहर किल्ल्याच्या पायऱ्या थेट कातळात कोरलेल्या असल्यामुळे थेट अंगावर येणाऱ्या असल्याने घसरून पडण्याचा धोका अधिक असतो. किल्ला चढत वा उतरत असताना खोल दऱ्या पाहून डोळे गरगरून अपघात होण्याची दाट शक्यता असते. महिला पर्यटकाच्या मृत्यूनंतर मात्र पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

loading image
go to top