Nashik : क्रीडा शुल्कात जिल्हाधिकाऱ्यांकडून 50 % माफी; शिक्षकांच्या संघर्षाला यश

Sakal-Impact
Sakal-Impactesakal

नाशिक : क्रीडा व शारिरिक शिक्षक संघटनेने क्रीडा शुल्क वाढीविरोधात क्रीडा स्पर्धांवर बहिष्काराचा इशारा दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेत क्रीडा शुल्कात ५० टक्के प्रवेश शुल्क माफीचा निर्णय घेतला. यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या मनमानी कारभाराला झटका बसला आहे.

क्रीडा व शारिरिक शिक्षक संघटनेने विविध माध्यमातून वाढलेली फी आणि जन्म दाखल्याला विरोध दर्शवीत बहिष्काराचा इशारा दिला होता. क्रीडा शिक्षकांच्या प्रयत्नांना आज काही प्रमाणात यश आले. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सर्व शाळांनी भरलेली प्रवेश फी ५० टक्के माफ करण्यास मान्यता दिली. जिल्हा पातळीवरील स्पर्धा ऑफ लाइनच घेण्याबाबत सोमवारी (ता.१५) शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहे. (Fifty percent waiver in sports fees by District Collector Nashik district sports and physical education teachers struggle success Nashik Sports News)

Sakal-Impact
Nashik : दादा भुसे यांची शिवभोजन केंद्राला Surprise visit

शाळांना भरलेली फी ५० टक्के परत मिळणार आहे.परंतु संघटना यावर थांबणार नसून डिसेंबर २०१४ च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक संघाकडून पन्नास रुपये आणि वैयक्तिक खेळाडू पंचवीस रुपये इतकीच फी घेण्याचा अधिकार क्रीडा कार्यालयाला असताना या विभागाने परस्पर शुल्क वाढ करीत विद्यार्थ्यांची आणि विनाअनुदानित/अनुदानित शाळांची लूट केली. क्रीडा विभागाच्या या मनमानी कारभाराची चौकशी करावी, तसेच तालुका पातळीवरचे क्रीडा स्पर्धा ऑफलाइन करण्याचा निर्णय झालेला आहे. जिल्हा पातळीवर ही स्पर्धा ऑफलाइन करण्याची मागणी संघटनेची असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

इन्फोबॉक्स

क्रीडा व शारिरिक शिक्षक संघटनेच्या मागण्या

- खेळाडू कल्याणच्या निधीचा ११ वर्षात वापरच नाही

- २०१५ प्रवेश शुल्क, क्रीडा शासकीय अनुदानाची चौकशी

- २०१७ वाटलेल्या क्रीडा साहित्य अनुदानाची चौकशी

- कोरोनात अडीच कोटीच्या क्रीडा साहित्य खरेदीची चौकशी

- प्रभारी ऐवजी कायमस्वरूपी क्रीडा अधिकारी मिळावा

- विभागीय क्रीडा संकुलातील साहित्य खरेदीची चौकशी

Sakal-Impact
Nashik : ‘Super 50’ उपक्रमांतर्गत 2170 विद्यार्थ्यांनी दिली परिक्षा

"जिल्हा पातळीवरील कोणताही संघ सहभागापासून वंचित राहिला तर संघटना स्पर्धा जागेवर बंद पाडेल. ऑनलाइन ज्यांचा झालेल्या आहेत. त्यांनी संघ आणावाच पण ज्यांचा झालेल्या नाहीत त्यांनी ही ऑफलाइन मुख्याध्यापकांचे ओळखपत्र आणून स्पर्धेत सहभागी व्हावे. जर खेळू दिले नाही तर ती स्पर्धा आहे, त्या ठिकाणी बंद पाडली जाईल. क्रीडा शिक्षक संघटनेच्या आंदोलनाला जिल्हा मुख्याध्यापक संघ, शिक्षक सेना, माध्यमिक शिक्षक संघ (टीडीएफ) सह जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनांचा पाठिंबा आहे."

- संजय चव्हाण, अध्यक्ष, नाशिक जिल्हा क्रीडा व शारीरीक शिक्षक संघटना

Sakal-Impact
Credai Nashik Metro Shelter Exhibition : एकाच छताखाली गृहशोधाची नाशिककरांना संधी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com