Dasara 2022 : सप्तशृंगदेवीला अखेर बोकडबळीची पूर्णाहुती

On Dasara, on Wednesday in Saptshringidevi's temple assembly hall, the president of the trust Vardhan P. Desai, Mankari and villagers.
On Dasara, on Wednesday in Saptshringidevi's temple assembly hall, the president of the trust Vardhan P. Desai, Mankari and villagers.esakal

वणी (जि. नाशिक) : आदिमाया-आदिशक्ती सप्तशृंगीमातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाची बुधवारी (ता. ५) विजयादशमीस शतचंडी यागास पूर्णाहुती देऊन सांगता झाली. दसरा टप्पा येथे न्यायालयाच्या निर्देश व बोकड बळीसंदर्भात निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार पाच वर्षांनंतर प्रतिनिधी व मानकरींच्या उपस्थित बोकडबळी दिल्यानंतर पूर्णाहुती देण्यात आली. दरम्यान मूर्ती संवर्धनानंतर यंदाच्या नवरात्रीत खानदेशासह राज्यभरातून सुमारे दोन ते अडीच लाखांवर भाविकांनी देवीचे प्रसन्न रूप डोळ्यांत साठवत आराधना केली. (finally bokad bali at Saptashrungi temple wani nashik Latest Marathi News)

सप्तशृंगगडाच्या शिखरावर बुधवारी (ता. ५) मध्यरात्री कीर्तिध्वजाचे मानकरी दरेगावचे गवळी पाटील कुटुंबीयातील सदस्यांनी कीर्तिध्वज फडकविल्यानंतर सकाळी कीर्तिध्वजाचे सप्तशृंगगडावर जमलेल्या हजारो भाविकांसह ग्रामस्थांनी दर्शन घेतले. दरवर्षीप्रमाणे अश्र्विन नवमीस सप्तशृंगगडावर नवमीच्या दिवशी शतचंडी याग व होमहवन विधी सुरू करून त्याची पूर्णाहुती दशमीच्या दिवशी बोकडबळीच्या विधीनंतर पुरोहितांच्या मंत्रघोषात बळीची आहुती देत दसऱ्याचा सोहळा पार पडला. बोकडबळीच्या विधिवत पूजेसाठी सरपंच नांदुरी, सप्तशृंगगड, विश्वस्त संस्था व परंपरेचे मानकरी यांनी महसूल व पोलिस प्रशासनाच्या प्राप्त सूचनेनुसार पूर्तता केली. स्थानिक ग्रामस्थ व भाविकांनी ही प्रक्रिया राबविताना विशेष सहकार्य केले.

पूर्णाहुतीप्रसंगी संस्थानाचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धन पी. देसाई, ध्वजाचे मानकरी गवळी परिवार सदस्य, बोकडबळी मानकरी, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे, पोलिस निरीक्षक समाधान नागरे, सप्तशृंगगडचे सरपंच रमेश पवार, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

देवीस पुरणपोळीचा नैवेद्य

सकाळी गडावर घटी बसलेल्या स्थानिक महिला भाविकांनी कीर्तिध्वजाचे दर्शन घेऊन आदिमायेस नैवेद्य देऊन बसवलेले घट विसर्जित केले. दुपारी देवीस पुरणपोळी, वरण, भात, भाजी आदी पदार्थांचा नैवेद्य देऊन नैवेद्य आरती होऊन उत्साहाची सांगता झाली. महाराष्ट्रासह विविध राज्यांतील आलेल्या तब्बल २५ हजार भाविकांच्या उपस्थितीत मंदिर गजबजून गेले होते. संपूर्ण गडावर भाविक ‘सप्तशृंगी माता की जय, बोल अंबे माते की जय’चा मोठ्या आवाजात जयघोष करत होते.

On Dasara, on Wednesday in Saptshringidevi's temple assembly hall, the president of the trust Vardhan P. Desai, Mankari and villagers.
SAKAL : ‘श्री सप्तशृंग निवासिनी’ पुस्तिकाचे ‘सकाळ’तर्फे आद्यपीठामध्ये प्रकाशन

शतचंडी याग उत्साहात

मंगळवारी (ता. ४) महानवमीनिमित्त देवी मंदिर सभामंडपात सायंकाळी सहाला शतचंडी यागाची सुरवात झाली. पुरोहित संघाच्या सर्व सदस्यांनी यज्ञविधीत सहभाग घेत मंत्रघोषात मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात यज्ञविधी झाला. सकाळी सप्तशृंगीदेवीच्या सुवर्ण अलंकारांची ट्रस्ट कार्यालयापासून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. पुरोहितांच्या मंत्रघोषात सातला देवीची महापूजा करण्यात आली. नवरात्रोत्सवानिमित्त श्री सप्तशृंगीदेवीची महापूजा विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धन पी. देसाई यांनी सपत्नीक केली.

प्रासादालयाचा लाभ

श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या प्रसादालयात सुमारे पाच हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मौजे सप्तशृंगगड येथील स्थानिक रहिवाशांना आज दसरानिमित्त विशेष दर्शन उपलब्ध करून देण्यात आले. भाविकांना सुरक्षित दर्शन घेण्यासाठी ट्रस्टमार्फत व्यवस्था करण्यात आली. नवरात्र उत्सवासाठी प्रमोद दीक्षित, विकास दीक्षित, विनोद दीक्षित, शेखर देशमुख, प्रसाद दीक्षित, मिलिंद दीक्षित, गौरव देशमुख, धनंजय दीक्षित, प्रवीण दीक्षित, सुनील दीक्षित, श्रीकांत दीक्षित आदी पुरोहित वर्गाने नवरात्रोदरम्यान पूजाविधी धार्मिक कार्यक्रम पार पाडले. तसेच उत्सव यशस्वितेसाठी सर्व ट्रस्ट कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांसह जिल्हा पोलिस व महसूल प्रशासन विभाग आदींनी विशेष परिश्रम घेतले.

On Dasara, on Wednesday in Saptshringidevi's temple assembly hall, the president of the trust Vardhan P. Desai, Mankari and villagers.
Accidental Death News : सिन्नर-निफाड रस्त्यावर दुचाकी अपघातात 2 ठार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com