फायनान्स कर्मचाऱ्याला लुटले; पाऊणेदोन लाखांचा ऐवज लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Crime News

फायनान्स कर्मचाऱ्याला लुटले; पाऊणेदोन लाखांचा ऐवज लंपास

मालेगाव (जि. नाशिक) : शहर व परिसरात चोऱ्या, घरफोड्या, पशुधन चोरीसह विविध गुन्ह्यांचे प्रकार वाढले असतानाच, मालेगाव- नांदगाव रस्त्यावरील ज्वार्डी- निमगाव रस्त्यावर ज्वार्डी शिवारात लघुशंकेसाठी थांबलेल्या फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला (Finance Company Employee) दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी लुटत सुमारे एक लाख ६३ हजार ७०० रुपयांचा ऐवज लंपास केला. बुधवारी (ता. २७) रात्री घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. (finance employee getting looted for one lakh sixty thousand Nashik Crime News)

खासगी फायनान्स कंपनीचे कर्मचारी दीपक घोडेराव (वय ३२, पांजरवाडी, ता. येवला) हे दुचाकीने नांदगाव रस्त्याने जात होते. निमगाव- ज्वार्डी रस्त्यावर मोरीजवळ ते लघुशंकेसाठी थांबले असता प्लॅटिना दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी घोडेराव यांच्या दुचाकीला असलेली बॅग लुटून नेली. त्यात एक लाख ५० हजार ७०० रुपये रोख, नऊ हजार रुपयांचा सॅमसंगचा मोबाईल, एक हजार रुपये किंमतीचे बायोमॅट्रीक मशीन (Biometric Machine), पाकीटातील तीन हजार रुपये रोख, आधारकार्ड, मतदान कार्ड, पॅनकार्ड, एटीएम कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स असा सुमारे एक लाख ६३ हजार ७०० रुपयांचा ऐवज लंपास केला.

हेही वाचा: नाशिक : डॉ. झाकिर हुसेन रूग्णालयात मद्य पार्टी

श्री. घोडेराव यांनी फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकांना या घटनेची माहिती दिली. कर्जदारांच्या पावत्यांसह रकमेचा हिशोब देत तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तालुका पोलिसांनी रस्ता लुटीचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व सहकारी संशयितांचा शोध घेत आहेत. नांदगाव- मालेगाव रस्त्यावर अनेक दिवसानंतर घडलेल्या रस्ता लुटीच्या प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा: स्‍वच्‍छतेसाठी नाशिककरांनी करावे मॉरल पोलिसिंग : राजेश पंडित

Web Title: Finance Employee Getting Looted For One Lakh Sixty Thousand Nashik Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top