भीक मागणाऱ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत; Mahavitaran अभियंत्याकडून वर्धा येथील संस्थेला 31 हजारांची देणगी

Children on signal at the wedding of Mahadistribution Engineer Ajay Sawale.
Children on signal at the wedding of Mahadistribution Engineer Ajay Sawale.esakal

वावी (जि. नाशिक) : गेल्या आठवड्यात अमरावतीमध्ये आयोजित एका विवाह सोहळ्यात पुणे-मुंबईसारख्या शहरात सिग्नलवर भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या, मात्र वर्धा येथील एका संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रवाहात आलेल्या ५० मुला -मुलींनी लावलेली उपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर मध्ये महावितरण कंपनीत सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या अजय सावळे यांनी त्यांच्या लग्नात या मुला-मुलींना वऱ्हाडी म्हणून मिरविले. एवढेच नाही तर आपल्या सहचारिणीच्या साक्षीने त्यांनी या मुलांच्या शिक्षणासाठी संस्थेकडे ३१ हजार रुपयांची देणगी धनादेशाद्वारे सुपूर्द केली. (financial assistance for the education of beggars 31 thousand donated by Mahavitaran Engineer to organization in Wardha nashik news)

सिन्नर तालुक्यातील वावी येथे महावितरणमध्ये गेल्या सात वर्षांपासून श्री. सावळे सहाय्यक अभियंता पदावर कार्यरत आहेत. ते मूळचे अमरावती जिल्ह्यातील असून गेल्या आठवड्यात ते विवाहबद्ध झाले.

त्यांची सहचारिणी नेहा वानरे यादेखील उच्चशिक्षित असून केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत त्यांची नुकतीच भारतीय वनविभागात सहाय्यक वनसंरक्षक या पदावर निवड झाली आहे. विवाह सोहळा आटोपल्यानंतर त्या डेहराडून येथील प्रशिक्षण केंद्रात हजर झाल्या.

विवाह सोहळ्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते वर्धा येथील उमेद एज्युकेशनल चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ‘संकल्प’ या आधार आश्रमातील मुला-मुलींनी. वऱ्हाडी म्हणून ही मुले श्री. सावळे यांच्या लग्नासाठी विशेष निमंत्रित होती.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

Children on signal at the wedding of Mahadistribution Engineer Ajay Sawale.
Nashik News : रेल्वेची महिन्याभरात 142 कोटींची कमाई

त्यांना विवाहस्थळी आणण्यासाठी स्वतंत्र बसची व्यवस्था करून देण्यात आली होती. पुणे , मुंबई , नागपूर सारख्या महाराष्ट्रातील मेट्रो पोलिटन सिटीतील सिग्नल वरची ही सर्व मुले शिक्षणासाठी मंगेशी मून यांच्या माध्यमातून वर्धा येथील 'संकल्प'केंद्रात वास्तव्यास आहेत. या उपक्रमामुळे नातेवाइकांनी कौतुक केले.

"पाच ते सहा वर्षांपूर्वी श्री. सावळे यांची रेल्वे प्रवासात ओळख झाली. तेव्हापासून ते आमच्या संस्थेला जोडले गेले. सिग्नलवर भीक मागणारी मुलांना वर्धा, नागपूर येथील सेवाभावी व्यक्तींच्या माध्यमातून शिक्षण सुरू आहे. वर्धा येथील ‘संकल्प’ प्रकल्पात ७० मुले-मुली असून पुण्यात ‘उमेद संजीवन’ या प्रकल्पात २० मुले व मुली आहेत."- मंगेशी मुन, संचालक, उमेद ट्रस्ट

Children on signal at the wedding of Mahadistribution Engineer Ajay Sawale.
नारोशंकराची घंटा : संस्कारापेक्षा जेवण महत्त्वाचे...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com