विवाहसोहळ्यांना धुमधडाक्यात सुरवात; ‘वेडिंग इंडस्ट्री’मध्ये मंगलमय वातावरण! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

wedding ceremony

‘वेडिंग इंडस्ट्री’मध्ये मंगलमय वातावरण! विवाहसोहळ्यांना सुरवात

sakal_logo
By
प्रशांत बैरागी

नामपूर (जि. नाशिक) : गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कोरोनाच्या (Corona) प्रादुर्भावामुळे सार्वजनिक, वैयक्तिक कार्यक्रम, लग्न समारंभ, इतर धार्मिक कार्यक्रमांना निर्बंध होते. परंतु, कोरोना रुग्णांच्या घटत्या संख्येमुळे लग्न समारंभ व इतर धार्मिक कार्यक्रमास काही निर्बंध कमी करण्यात आले आहे. शुक्रवारपासून (ता. १९) विवाहसोहळ्यांना धुमधडाक्यात सुरवात होणार असल्याने ‘वेडिंग इंडस्ट्री’मध्ये मंगलमय वातावरण आहे.

कोरोनाचा सर्वाधिक फटका वेडिंग इंडस्ट्रीला

हिंदू परंपरेनुसार तुळशी विवाहानंतर होणारे विवाह हे शुभ मानले जातात. परंपरेला धरून रितीरिवाजानुसार लग्न समारंभ रूढी-परंपरा मानत शुक्रवारपासून मोसम खोऱ्यात लग्न समारंभ धुमधडाक्यात सुरू होणार आहेत. दोन वर्षातील कोरोनाचा सर्वाधिक फटका विवाहसोहळ्यांवर अवलंबून असणाऱ्या केटरिंग व्यावसायिक, बँड पार्टी, मंडप व्यावसायिक, किराणा दुकानदार, फोटोग्राफी, ब्युटी पार्लर, कापड व्यावसायिक, फुलभांडार, घोडेवाले, सुवर्णपेढी, सुतारकाम करणारे व्यावसायिक, स्टीलभांडे व्यावसायिक, कुंभार व्यावसायिक, फर्निचर मॉल, लग्नपत्रिका छपाई व्यावसायिक, जनरल स्टोअर्स अशा अनेक व्यावसायिकांना बसला.

हेही वाचा: काहीच न करणाऱ्या नगरसेवकांना मतदार दाखवणार घरचा रस्ता | Nashik

एकूण ८३ विवाहमूहर्त

दीपावली उत्सवानंतर आता लग्नाचा धडाका सुरू होणार असल्याने १९ नोव्हेंबर ते ९ जुलैपर्यंत मुख्य कालावधीत नियमित ६३ व आपतकाल २० असे ८३ विवाहमुहूर्त असल्याचे येथील ग्रामपुरोहित कुंदनदेवा भातखळे यांनी सांगितले. नोव्हेंबरमध्ये ४, डिसेंबर ११, जानेवारी ५, फेब्रुवारी ६, मार्च ४, एप्रिल ६, मे ११, जून १०, व जुलै ६, असे मुख्य मुहूर्त आहे तर आपतकाल मुहूर्तांमध्ये नोव्हेंबर ५, फेब्रुवारी ७, मार्च ८ असे मुख्य व आपतकाल मिळून एकूण ८३ मूहर्त आहेत. विवाह समारंभावर अनेक कुटुंबाची रोजीरोटी अवलंबून असल्यामुळे पंचांगकर्त्यांनी योग्य निर्णय घेऊन हे मुहूर्त दिले आहेत.

''लॉकडाउनच्या वेळेस बुकिंगचे पैसे शंभर टक्के परत दिले होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून मंगल कार्यालये ओस पडली होती. यामुळे आमच्या कार्यालयाचा देखभाल दुरुस्तीचा खर्चही निघाला नाही. मात्र, यावर्षी मुहूर्त भरपूर असल्याने व कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. यामुळे मंगल कार्यालये परत सजतील, अशी आशा आहे.'' - शिवाजी सावंत, सचिव, शिवछत्रपती सहकारी मंगल कार्यालय, नामपूर

हेही वाचा: ‘कॉन्सन्ट्रेटर’ जमा करा अन्यथा निवडणुकीला बंदी

परिस्थीती आता पूर्वपदावर

''गेल्या दीड-दोन वर्षांपासून ओढवलेल्या कोरोना संसर्गामुळे केटरर्स चालक- मालक व कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. परंतु, यावर्षी कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने व शासनानेही सर्व निर्बंध हटवल्याने येणारे दिवस केटरर्स चालक - मालक व कामगारांना नक्कीच सुखाचे येतील, अशी अपेक्षा आहे.'' - अनुसयाबाई पवार, स्वयंपाकी, नामपूर

''लग्न सोहळे आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम दोन वर्षे बंद होते. त्यामुळे फोटोग्राफर, व्हिडीओ शुटिंग करणाऱ्यांची आर्थिक अडचण वाढली होती. अनेकांनी दोन वर्षापूर्वी महागडे कॅमेरे घेतले होते. मोठा आर्थिक फटका बसला होता. आता काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.'' - सतीश कापडणीस, एकविरा फोटो स्टुडिओ, नामपूर

loading image
go to top