नाशिक : मालेगावात 3 दुकानांना आग; लाखोंचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fire

नाशिक : मालेगावात 3 दुकानांना आग; लाखोंचे नुकसान

मालेगाव (जि. नाशिक) : शहराजवळील मनमाड चौफुली वरील चंदनपुरी शिवारातील तीन दुकानांना आकस्मिक आग लागली. आगीत रद्दी, टायर व ऑईल जळाल्याने लाखोंचे नुकसान झाले. महानगरपालिका अग्निशामक दलाच्या नऊ बंबांनी आग तातडीने विझवल्याने आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याची भिती असलेल्या दहा दुकानातील ऐवज वाचला.

चौफुलीवर असलेल्या दुकानांच्या पाठीमागे शेती आहे. शेतात जाळलेल्या काडी कचऱ्याची झळ लागून रुपेश ट्रेडिंग या संजय येवले यांच्या रद्दी गोदामाला आग लागली. यानंतर जमील शेख यांच्या एस.के. टायर व सोहेल कच्छी यांच्या एम.एम. लुब्रीकेंट्स याही दुकानात आग लागली. ज्वलनशील वस्तू असल्याने आगीचे तांडव वाढले. त्यातच शुक्रवार असल्याने दुकाने बंद होती. मनपा उपायुक्त राजू खैरनार या मार्गाने जात असताना त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती कळविली. अग्निशमन अधिक्षक संजय पवार व सहकाऱ्यांनी नऊ बंबाच्या खेपा करून आग आटोक्यात आणली. किल्ला पोलिस मदतीला धावून आले. या प्रकरणी किल्ला पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा: रिक्षासाठी घरगुती गॅसचा वापर; 30 सिलेंडर जप्त, तिघे संशयित ताब्यात

हेही वाचा: एसटी सुसाट.!; मालेगावी दररोज 6 लाखांचे उत्पन्न

Web Title: Fire At 3 Shops In Malegaon Nashik Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :MalegaonNashikfire
go to top