एसटी सुसाट.!; मालेगावी दररोज 6 लाखांचे उत्पन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MSRTC Buses Malegaon

एसटी सुसाट.!; मालेगावी दररोज 6 लाखांचे उत्पन्न

मालेगाव कॅम्प (जि. नाशिक) : कोरोनाचे संकट आणि कर्मचाऱ्यांचा दीर्घकालीन संप मिटल्यानंतर ‘एसटी’ (MSRTC) आता सुसाट धावत आहे. मालेगाव आगाराच्या (Malegaon Depot) मध्यम व लांब पल्ल्याच्या सर्वच सेवा सुरू झाल्या आहेत. या आगारातील बसेस दैनंदिन सतरा हजार किलोमीटरचा पल्ला गाठत असून, एसटीचे दररोजचे उत्पन्न तब्बल सहा लाखावर पोहोचले आहे. विश्‍वासपात्र सेवा व पसंतीच्या जोरावर एसटी पूर्वपदावर येत आहे. सवलतीच्या योजना वेग घेत आहेत. (Malegaon daily income of six lakhs through MSRTC Nashik News)

कोरोनाकाळात बंद पडलेली सेवा आणि दीर्घकालीन संप यामुळे प्रवाशांवर आपत्ती ओढवली. खासगी वाहतुकदारांनी आपत्तीला इष्टापत्ती मानून प्रवाशांना अक्षरशः वेठीस धरले. एसटीने पूर्वपदावर येत उत्पन्नात भरारी घेतली आहे. बडतर्फ व बदली कर्मचाऱ्यांना कोर्टाच्या आदेशान्वये हजर करून घेतले आहे. लग्नसराईमुळे प्रवासी संख्या वाढत आहे. गर्दीने फुलून गेलेले बसस्थानक गतवैभवाची आठवण करून देत आहे.

येथील आगारात एसटीच्या विशेष सवलत योजना सुरू झाल्या आहेत. अभियांत्रिकी व तत्सम पदविका प्रविष्ठ विद्यार्थ्यांना सवलतीचे पास वितरित होत आहेत. पासधारकांकडून एसटीला दररोज २५ हजाराचे उत्पन्न मिळत आहे. सध्या सुट्ट्या असल्याने चार दिवसांत ‘आवडेल तिथे प्रवास’अंतर्गत महाराष्ट्र दर्शन योजनेचे पास वितरण होत आहेत. ज्येष्ठ नागरिक, अपंग प्रवासी आदी योजनेसाठी नोंदणी (स्मार्ट कार्ड) योजना सुरु आहे. प्रवाशांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: Malegaon : मुबलक उसामुळे राज्यात अजुनही 121 साखर कारखाने सुरु

आगारातील समस्या
एसटीचे प्रवासी पळवण्यात खासगी वाहनचालक थेट बस आगारात घुसखोरी करत आहेत. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे ही टोळधाड सुरू असल्याचे बोलले जात आहे. अत्यल्प स्वच्छता कर्मचाऱ्यांमुळे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. एसटी आगारात अनेक वर्षांपासून डांबरीकरण नसल्याने आगार खड्डेमय बनले आहे. स्वच्छता व डांबरीकरण तत्काळ व्हावे तसेच सायकल स्टँड सुरू करावा, अशी मागणी नियमित प्रवाशांकडून होत आहे.

लांब पल्याची सेवा कार्यान्वित
मालेगाव आगारातून पुणे, अक्कलकोट, सोलापूर, पंढरपूर, अलिबाग, अकोले, धुळे, पाचोरा, जळगाव, नंदुरबार, चाळीसगाव, अहमदनगर तसेच अहमदाबाद, सुरत, उनई या प्रमुख शहरासाठी ये- जा सुविधा सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागात मुक्कामी बससेवा सुरू झाली आहे.

हेही वाचा: Nandgaon : उन्हाळी सुट्टीतही 'रुम टु रिड' चा उपक्रम

दृष्टीक्षेपात मालेगाव आगार
हजर कर्मचारी : १००टक्के
दैनिक उत्पन्न : ६ लाख रुपये
सवलतीच्या योजनाद्वारे दैनिक उत्पन्न : २५ हजार रुपये
दररोज होणारी वाहतूक : १९ हजार किमी
स्वच्छता कर्मचारी : ०२

हेही वाचा: कृषी विभागातील जागा भरा अन्यथा मंत्रालय हलवून टाकेल : गुलाबराव पाटील

कर्मचारी एकजुटीने सेवा देत आहेत. बसेसच्या सर्व फेऱ्या सुरू झाल्या आहेत. प्रवाशांचा प्रतिसादही चांगला आहे. सर्व कर्मचारी हजर झाले असून, तत्पर सेवा देण्यासाठी एसटी कटिबद्ध आहे. - किरण धनवटे, व्यवस्थापक, मालेगाव बसस्थानक

बससेवा सुरू झाल्याने प्रवासी सुखावले आहेत. खासगी प्रवासी सेवांच्या तुलनेत एसटीबद्दल सर्वसामान्यांना विश्‍वासपात्र वाटते. एसटीने आता नवी झळाळी घ्यायला हवी.
- सचिन निकम, सामाजिक कार्यकर्ता, दाभाडी

Web Title: Malegaon Daily Income Of Six Lakhs Through Msrtc Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikMSRTC
go to top