रिक्षासाठी घरगुती गॅसचा वापर; 30 सिलेंडर जप्त, तिघे संशयित ताब्यात

seized LPG Cylinder
seized LPG Cylinderesakal

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील सरदारनगर भागात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका टपरीवजा गुदामात छापा टाकून घरगुती गॅस सिलिंडर (Household LPG Gas Cylinder) रिक्षाला (Auto Rikshaw) वापरण्यासाठी रिफिलिंग (Refilling) सुरु असतानाचा काळाबाजार व अवैध अड्डा उद्‌ध्वस्त केला. पोलिसांनी १४ भरलेले व १६ रिकामे असे ३० गॅस सिलिंडर, दोन पिस्टन पंप, दोन वजन काटे, दाेन रेग्युलेटर असा सुमारे ८० हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला. तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. चार दिवसापूर्वी ही कारवाई करण्यात आली. रमजान ईदच्या (Ramzan eid) उत्सवात व बंदोबस्तात या कारवाईबद्दल गुप्तता पाळण्यात आली होती. (Use of domestic gas for rickshaw 30 cylinders seized three suspects in custody Nashik Crime News)

शहरात असंख्य ठिकाणी इंधनाचे दर वाढल्याने अवैध इंधन म्हणून घरगुती गॅस सिलेंडरचे रिफिलिंग करुन त्याचा वापर करण्यात येतो. सिलेंडर रिफिलिंग करुन देणारे अनेक महाभाग शहरात आहेत. सरदारनगर गुदामातील अवैध रिफिलिंगचा प्रकार मोबाईल चित्रीकरणातील स्टिंग ऑपरशनमधून उघडकीस आला होता. शाहीद अख्तर शकील अहमद उर्फ अख्तर काल्या (३४, रा. फार्मसीनगर) हा घरगुती गॅस वाहनांमध्ये इंधन म्हणून भरुन देतो. त्याच्या ताब्यात गॅस सिलेंडरचा साठा असल्याची माहिती मिळाली.

seized LPG Cylinder
Nashik : बोराळेचा कांदा दुबईच्या बाजारात!

यानंतर पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप पाटील, हवालदार निकुंभ, पोलिस नाईक देवा गोविंद, चोपडा, शरद मोगल, भुषण मोरे, नरेंद्र कोळी, दत्तात्रेय माळी यांनी ही कारवाई केली. सिलेंडर घरगुती ग्राहकांचे होते की गॅस एजन्सीशी संधान साधून मिळविले होते या बाबत निश्‍चित माहिती मिळू शकली नाही. आझादनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी अख्तर काल्यासह तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

seized LPG Cylinder
Ramzan : बाशी तिवासीला स्थानिक पर्यटनाला जोर; यंत्रमागाचा खडखडाट बंद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com