
Fire Accident : अंबड औद्योगिक वसाहतीत कंपनीबाहेरील पुठ्ठ्यांना आग
सिडको (जि. नाशिक) : अंबड औद्योगिक वसाहतीतील सांबे इंजिनिअरिंग कंपनीच्या बाहेर ठेवलेल्या बॉक्समधील वस्तूंना अचानक आग लागली. आगीत कंपनीच्या काही वस्तूंचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. (Fire at cardboard boxes outside company in Ambad Industrial Estate nashik news )
हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक
हेही वाचा: Nashik News : नववर्षाची सुरवात गारठ्याने!
सिडको अग्निशमन विभागाच्या बंबाने आग अगदी काही मिनिटातच आटोक्यात आणली. संध्याकाळी पाचच्या सुमारास आग लागली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता सिडको अग्निशमन विभागास याबाबत सूचित केले. अग्निशमन विभागाच्या वतीने लागलीच पुठ्ठ्यांना लागलेली आग विझावण्यात आली. अग्निशमन विभागाचे लिडिंग फायरमन एम. एन. मधे, फायरमन पी. जी. लहामगे, एस. के. शिंदे, एम. एन. शेख व चालक रवी आमले यांनी आग आटोक्यात आणली.
हेही वाचा: Jindal Fire Accident: दुर्घटनाग्रस्त जिंदाल कंपनीची कामगारमंत्री सुरेश खाडेंकडून पाहणी; पाहा Photos