Nashik Fire Accident: माळेगाव औद्योगिक वसाहतीतील H.N.G. कारखान्यात स्फोट

आगीने रौद्र रूप धारण केल्याने लोळ सर्वदूर पसरल्याने माळेगाव एमआयडीसीमध्ये धूर पसरला होता.
Fire broke out at Hindustan Glass Limited Company in Malegaon MIDC due to explosion
Fire broke out at Hindustan Glass Limited Company in Malegaon MIDC due to explosionesakal

सिन्नर : माळेगाव (ता. सिन्नर) औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्तान नॅशनल ग्लास कारखान्यात (एच.एन.जी.) शुक्रवारी (ता. २९) रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास कंपनीतील भट्टीचा स्फोट होऊन आग लागली.

आगीने रौद्र रूप धारण केल्याने लोळ सर्वदूर पसरल्याने माळेगाव एमआयडीसीमध्ये धूर पसरला होता. (Fire broke out at Hindustan Glass Limited Company in Malegaon MIDC due to explosion at sinnar nashik)

यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याचा प्राथमिक अंदाज असून, वित्तहानी याबाबत रात्री उशिरापर्यंत काही ठोस माहिती मिळू शकली नाही.

आग विझविण्यासाठी सिन्नर नगर परिषद अग्निशमन दल व माळेगाव एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेतले. आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याची टंचाई भासत असल्याने नाशिक येथून अग्निशमन दलाच्या बंबांना पाचारण करण्यात आले. या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचा अंदाज असून, घटनास्थळी सर्वत्र काळ्या धुराचे साम्राज्य पसरल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

Fire broke out at Hindustan Glass Limited Company in Malegaon MIDC due to explosion
Bus Fire accident: मध्य प्रदेशात भीषण अपघातानंतर बसला लागली आग, १२ जणांचा होरपळून मृत्यू, १४ जखमी

अग्निशमन दलाकडून रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. या वेळी माळेगाव एमआयडीसी पोलिस परिश्रम घेत होते.

आग नेमकी कशामुळे लागली, हे रात्री उशिरापर्यंत समजले नाही. रात्री साडेअकरापर्यंत अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम करीत होते.

Fire broke out at Hindustan Glass Limited Company in Malegaon MIDC due to explosion
Nashik Fire Accident: मालेगावात आगीत 22 घरे जळून खाक; लाकडी फळ्यांमुळे आगीचे रौद्ररूप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com