नाशिक : आगीत लाखोंचा चारा खाक; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fire

नाशिक : आगीत लाखोंचा चारा खाक; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

आराई (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यातील आराई गावालगत शिवारातील गट नंबर १० मध्ये प्रभाकर सोनवणे यांच्या खळ्यातील १० ते १२ ट्रॉली मक्याच्या चाऱ्यास अचानक लागलेल्या आगीत सर्व चारा भस्मसात झाला. आग विझवण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडाली होती. सर्व चारा जळाल्यामुळे त्यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे. शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी लगेच घटनास्थळी धाव घेत अग्निशामक दलाला पाचारण केले.

सध्या उन्हाचा तडाखा सुरू आहे. त्यात अज्ञात व्यक्तीने आग लावली. जोराचा वारा असल्याने जळालेला चारा उडून दुसरीकडे गेल्याने इतरही ठिकाणी किरकोळ स्वरूपाची आग लागून नुकसान झाले. वेळीच आग आटोक्यात आली. अन्यथा इतर ठिकाणचा चाराही जळून खाक झाला असता. सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही. सर्वत्र कांदा काढणीच्या कामात शेतकरी व्यस्त असल्यामुळे मदतकार्यात अडचणी निर्माण झाल्या. मदत उपलब्ध होण्याच्या आतच आगीने रौद्ररूप धारण केले. अग्निशामक बंब पोहोचेपर्यंत उशीर झाला होता. तरीही स्थानिकांनी मोठ्या शर्थीने मिळेल त्या साधनाने चारा वाचविण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा: Nashik : पिल्लं दगावली, पण आईला वाचविण्यात प्राणीमित्राला यश

''अज्ञात व्यक्तीने केलेल्या कृत्यामुळे चाऱ्यास आग लागली. त्यामुळे जनावरांची उपासमार होणार आहे. मुक्या जनावरांचे काय होईल याची चिंता आहे.'' - प्रभाकर सोनवणे, नुकसानग्रस्त शेतकरी

या वेळी डॉ. गोकुळ अहिरे, माधव अहिरे, परशुराम आहिरे, नंदकुमार अहिरे, प्रभाकर सोनवणे, अशोक सोनवणे, विजय सोनवणे, शांताराम सोनवणे, मनेश सोनवणे, सुरेश अहिरे, गणेश अहिरे, रामदास अहिरे, स्वप्निल अहिरे, भारत अहिरे, वसंत भदाणे, रोशन सोनवणे, सटाणा अग्निशामक विभागप्रमुख संदीप पवार, कर्मचारी भूषण सोनवणे, दत्तात्रेय नंदाळे, बापू नंदाळे, विवेक देवरे आदींनी आग आटोक्यात आणली.

हेही वाचा: नवरदेव शेतकरी पुत्राने गाडीवर चढविला बळीराजाचा साज

Web Title: Fire Burned Millions Of Fodder Loss Of Farmer Nashik Agriculture News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Farmeragriculturefire
go to top