esakal | असा कसा दैवाचा फेरा? घरदार अन् संसाराची व्हावी मातीच माती!

बोलून बातमी शोधा

bramhanwadi fire.jpg

कोरोनामुळे एक तर अगोदरच लॉकडाऊन, त्यात हाताला काम नाही म्हणून गरीब- दीनदुबळ्या लोकांना एकवेळचे खाणेही नशीब होत नाही. आणि त्यात जेव्हा अशी काही घटना घडते तेव्हा उरली सुरली हिम्मतही सुटते. "गरिबी- श्रीमंती असा वाद नाही..परंतु जे काही कष्टाने मिळवलयं त्याची पण अशी माती व्हावी? असा काय केला होता गुन्हा देवा आम्ही?" असा प्रश्न आपसूकच मग या गरीबांकडून विचारला जातो. (ब्राह्मणगाव) गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या हिरेवाडी परिसरातील आदिवासी वस्तीत अशीच एक घटना घडली. ज्याने गरींबाच्या संसाराची अगदी माती माती झाली आहे. 

असा कसा दैवाचा फेरा? घरदार अन् संसाराची व्हावी मातीच माती!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोनामुळे एक तर अगोदरच लॉकडाऊन, त्यात हाताला काम नाही म्हणून गरीब- दीनदुबळ्या लोकांना एकवेळचे खाणेही नशीब होत नाही. आणि त्यात जेव्हा अशी काही घटना घडते तेव्हा उरली सुरली हिम्मतही सुटते. "गरिबी- श्रीमंती असा वाद नाही..परंतु जे काही कष्टाने मिळवलयं त्याची पण अशी माती व्हावी? असा काय केला होता गुन्हा देवा आम्ही?" असा प्रश्न आपसूकच मग या गरीबांकडून विचारला जातो. (ब्राह्मणगाव) गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या हिरेवाडी परिसरातील आदिवासी वस्तीत अशीच एक घटना घडली. ज्याने गरींबाच्या संसाराची अगदी माती माती झाली आहे. 

अशी घडली घटना....

हिरेवाडी परिसरातील आदिवासी वस्तीत राहणारे श्रावण धोंडू कुंवर  यांच्या झोपडीत सकाळी दहाच्या सुमारास स्वयंपाक शिजत होता. स्वयंपाक करताना अचानक गॅस शेगडी जवळ आग लागली, ती आग बघता बघता सिलेंडरपर्यंत पोहचली.आग बघून कुंवर यांची बायको घराबाहेर पडली. सिलेंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत संसारोपयोगी वस्तू जळून खाक तर झाल्याच, पण त्याचसोबत बाजूला राहत असलेले झूराबाई नागू पवार यांची झोपडीही जळून खाक झाली आहे. सिलेंडरच्या स्फोटामुळे श्रावण कुंवर यांच्या घरातील संसारोपयोगी सर्व वस्तू, बाजरी तीन पोते, तीन पोते गहू ,एक पोते तांदुळ, घरात असलेले सोने असा दीड लाख रुपयांचे नुकसान झाले असून तर झुराबाई पवार यांच्या झोपडीला लागलेल्या आगीमुळे घरातील सोने, तीन पोते बाजरी, चार पोते गहू, तांदुळ कट्टे, घरातील संसारोपयोगी वस्तूसह मोल मजूरीचे, व बकरी विकण्याचे असे एक लाख पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कुठलेही जिवितहानी झाली नाही.

नागरिकांनी दाखविली सतर्कता

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील, ग्रामविकास अधिकारी एन. एन. सोनवणे, जेष्ठ नेते राघो नाना अहिरे, पंचायत समिती सदस्य अतुल नाना अहिरे, आमदार दिलीप बोरसे, पोलीस पाटील मालपाणी यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी पोलीस हवालदार हेमंत कदम, योगेंद्र शिसोदे यांनी पंचनामा केला.
झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटात कुठलेही जिवितहानी झाली नसली तरी झालेला सिलेंडर स्फोट इतका मोठा होता की बाजूच्या झुराबाई पवार यांच्या घराला आग लागली, त्या पाठोपाठ शेजारील झोपडीला आग लागली, परंतु परिसरातील नागरिक यांनी सतर्कता दाखवीत आग विझविली.

हेही वाचा > धक्कादायक! पिकअप गाडीवर नाव "जय बजरंग बली" अन् आत मात्र अंगावर काटा आणणारी गोष्ट..

पाच दिवस पुरेल इतका किराणा तर मिळाला..पण पुढे काय?

गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन नुकसान झालेल्या दोन्ही कुटुंबियांना तात्काळ मदत म्हणून सटाणा पोलीस स्टेशनच्या वतीने पाच दिवस पुरेल इतका किराणा पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आला. तर बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी या दोन्ही कुटूंबियांना संसारोपयोगी वस्तूसह पांघरण्यासाठी कपड्यांची मदत केली.यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव अहिरे, माजी उपसरपंच सुभाष अहिरे, गोटू पगार, माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण अहिरे, कैलास अहिरे, सयाजी अहिरे, हरी अहिरे उपस्थित होते.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! हळद लागली अन्‌ अक्षता रुसल्या! सप्तपदीच्या फेऱ्यांपूर्वीच नववधूचा संसार उद्‌ध्वस्त