esakal | काजव्यांच्या लुकलुकला मुकणार पर्यटक! वन्यजीवगणनाही रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

firefly festival

काजव्यांच्या लुकलुकला मुकणार पर्यटक! वन्यजीवगणनाही रद्द

sakal_logo
By
कुणाल संत

नाशिक : दर वर्षी नाशिक वन्यजीव विभागाकडून (wildlife department) पावसाळा सुरू होण्यापूर्वी मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात आणि जूनच्या पहिल्या पंधरवड्यात भंडारदरा-कळसूबाई अभयारण्याच्या परिसरात काजवा महोत्सवाचे (Firefly festival) आयोजन केले जाते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे (corona virus) काजवा महोत्सव रद्द करण्यात आला आहे. कोरोनामुळे वन विभागाने भंडारदरा कळसूबाई अभयारण्याच्या परिसरात भरविला जाणारा काजवा महोत्सव रद्द केला आहे. महोत्सव रद्द करण्याचे हे दुसरे वर्ष आहे. (Firefly-festival-cancelled-due-corona-virus-marathi-news)

भंडारदरा-कळसूबाई अभयारण्यात भरणारा महोत्सव रद्द

पावसाची चाहूल लागताच अंधारातील काजव्यांची लखलखती दुनिया अनुभवण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक यांसह अनेक ठिकाणांहून हजारो पर्यटक भंडारदरा, कळसूबाई-हरिश्चंद्रगड जंगलात येतात. जंगलात सादडा, हिरडा, जांभूळ, आंबा, उंबर, बेहडा वृक्षांवर काजवे चमकतात. पर्यटकांची या भागातील वाढती गर्दी लक्षात घेता काही वर्षांपासून वन विभागाच्या वन्यजीव विभागातर्फे या ठिकाणी काजवा महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. यातून विभागासह स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो. यातून दर वर्षी लाखाचे उत्पन्न विभागास मिळते. मात्र, दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे यंदाही वन्यजीव विभाग आणि संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या निर्णयानंतर काजवा महोत्सव रद्द करण्यात आला आहे.

हेही वाचा: जितेंद्र भावे यांचे अर्धनग्न आंदोलन : महापालिका करणार चौकशी

वन्यजीवगणनाही रद्द

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता दर वर्षी बुधवारी (ता. २५) बुद्धपौर्णिमेस नांदूरमध्यमेश्‍वर अभयारण्यात करण्यात येणारी वन्यजीव गणनाही रद्द करण्यात आल्याची माहिती वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी दिली.

हेही वाचा: गोपानाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेस ६ एप्रिलपर्यंत मान्यता

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षाता घेता वरिष्ठाच्या आदेशानुसार काजवा महोत्सव रद्द केला आहे. यांसह भंडारदरा-कळसूबाई अभयारण्यात पर्यटकांना प्रवेशबंदी कायम ठेवली आहे.

-अमोल आडे, वन परिक्षेत्र अधिकारी, भंडारदरा