हृदयाची ICD शस्त्रक्रिया करणारे उत्तर महाराष्ट्रातील पहिले शासकीय रुग्णालय!

पंतप्रधान कार्यालयाशी(PMO) संपर्क साधून राष्ट्रीय आरोग्य निधीतून सहा लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेत हृदयाला शरीरातच शॉक देऊन वाचवणारे यंत्र बसवण्याची ICD ही दुर्मिळ शस्रक्रिया करून रुग्णाचे प्राण वाचवले.
Implantable Cardioverter Defibrillator
Implantable Cardioverter Defibrillatore-sakal
Updated on

इंदिरानगर : नाशिक येथील शासनाच्या संदर्भ सेवा रुग्णालयातील हृदयरोग तज्ञ (Cardiologist) डॉ अतुल पाटील आणि शासकीय यंत्रणेने हातावर पोट असलेल्या साहेबराव पाटील यांच्यासाठी थेट पंतप्रधान कार्यालयाशी(PMO) संपर्क साधून राष्ट्रीय आरोग्य निधीतून सहा लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेत हृदयाला शरीरातच शॉक देऊन वाचवणारे यंत्र बसवण्याची ICD (Implantable Cardioverter Defibrillator) ही दुर्मिळ शस्रक्रिया करून या रुग्णाचे प्राण वाचवले. विशेष म्हणजे शासकीय रुग्णालयात ही शस्रक्रिया करणारे संदर्भ रुग्णालय उत्तर महाराष्ट्रातील पहिले रुग्णालय ठरले आहे. (First Government Hospital in North Maharashtra to perform Cardiac ICD Surgery)

पाटील यांना मिळाले जीवदान!

पाटील यांना हृदयविकाराचा त्रास होता अचानक त्यांच्या हृदयाचे ठोके वाढत होते. दोन वेळा त्यांना तात्काळ बाह्य स्वरूपातली शॉक ट्रीटमेंट(shock treatment) देऊन त्यांचा जीव वाचला होता. महिनाभरापूर्वी ते संदर्भ रुग्णालयात डॉ.पाटील यांच्याकडे आले. त्यांच्या सर्व तपासण्या केल्यानंतर त्यांना स्पेस मेकर(space maker) बसवण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांनी असमर्थता दाखवली. उपरोक्त शस्त्रक्रियेचा पर्याय होता मात्र त्यासाठी मोठा खर्च होता. आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि इतर शासकीय आरोग्य योजनेत याचा अंतर्भाव होत नाही. त्यामुळे रुग्णालयासमोर देखील अडचण होती. मात्र उपसंचालक डॉ पी.डी.गांडाळ, वैद्यकीय अधीक्षक डॉ.व्ही.बी. नामपल्ली आणि विशेष कर्तव्य अधिकारी डॉ. संजय कुटे यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधून या रुग्णाचे आवश्यक ते सर्व कागदपत्रे तेथे पाठवून राष्ट्रीय आरोग्य निधीतून मदत करण्याची मागणी केली. तेथे ती मंजूर करण्यात येऊन रुग्णालयाला सहा लाख रुपयांचा निधी देण्यात आला. त्यानंतर ही जटील शस्त्रक्रिया पार पडली . इतर सर्व खर्च देखील शासकीय रुग्णालय असल्याने मोफत झाल्याने पाटील यांना जीवदान मिळाले.

Implantable Cardioverter Defibrillator
लस घ्‍यायचीय तर कोरोना निगेटिव्हचा अहवाल हवा

असे चालते ICD यंत्राचे काम

खांद्याच्या बाजूला हे यंत्र शरीरात बसवले जाते. तेथून दोन तार थेट हृदयाशी जोडण्यात येतात.यंत्रातील सेन्सर(Sensor) प्रणाली 24 तास हरहड ठेवला जातो ज्यावेळी हृदयाच्या ठोक्यांची नोंद ठेवते. ठोके साधारण 200 पेक्षा जास्त अथवा धोकेदायक पातळी ओलांडतात त्यावेळी यंत्रात असलेले सेन्सर्स जागृत होऊन हृदयाला आतल्या आत शॉक देतात. त्यामुळे हृदय बंद पडत नाही आणि रुग्णाचे प्राण वाचतात. प्रतिक्रिया -डॉ अतुल पाटील (हृदयरोग तज्ञ) या उपचार पद्धती साठी मोठा खर्च लागतो. सर्वांनाच तो करता येणे शक्य नाही .त्यामुळे सध्या राज्यात प्रचलित असलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजने मध्ये या उपचाराचा समावेश झाला तर अनेक गरजू रुग्णांना याचा लाभ होऊ शकतो.

या डॉक्टरांच्या हस्ते झाली शस्त्रक्रिया

डॉ.पाटील यांना या शस्त्रक्रिये दरम्यान डॉ .नितीन कोचर,डॉ .श्रीपाद खैरनार,डॉ. विक्रांत मन्नीकर,डॉ .अभिषेक संकलेचा,तंत्रज्ञ रामनाथ जाधव,परिचारिका गोसावी,खैरनार,पटेल आदींनी सहाय्य केले.

Implantable Cardioverter Defibrillator
माणूसकीला काळीमा!! मुंबईत रूग्णाला चक्क फूटपाथवर फेकलं...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com