Jagannath Rathotsav: नाशिकमध्ये आज प्रथमच जगन्नाथ रथोत्सव; आठवडाभर विविध धार्मिक- सांस्कृतिक कार्यक्रम

Jagannath Puri Rath Yatra
Jagannath Puri Rath Yatraesakal

Jagannath Rathotsav : चारधामपैकी एक धाम असलेल्या जगन्नाथपुरीचे मोठे महत्त्व आहे. येथील जगप्रसिद्ध रथयात्रेच्या धर्तीवर नाशिकमध्येही रथयात्रेचे आयोजन पंचमुखी हनुमान देवस्थानतर्फे मंगळवारी (ता. २०) करण्यात आले आहे.

प्रथमच निघणाऱ्या या रथोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्तिचरणदास यांच्यासह रथयात्रा उत्सव समितीने केले आहे. (First Jagannath Rathotsav in Nashik today Various religious cultural programs throughout week nashik news)

आषाढ शुक्ल द्वितीयेचे औचित्य साधत मंगळवारी सकाळी दहा वाजता जुन्या आडगाव नाक्यावरील श्री पंचमुखी हनुमान मंदिरापासून मान्यवरांच्या उपस्थितीत रथोत्सवाला प्रारंभ होईल. तत्पूर्वी सकाळी आठ वाजता भगवान जगन्नाथांची पूजा, आरती, शृंगार व भोग नैवेद्य विधी पार पडेल.

सकाळी दहा वाजता श्रींची रथात विधिवत स्थापना झाल्यावर रथोत्सवास प्रारंभ होईल. शहराच्या मुख्य भागातून रथोत्सव मार्गक्रमण करेल, त्यानंतर दुपारी पंचमुखी हनुमान मंदिर येथे रथोत्सवाची सांगता होईल.

रथोत्सवानिमित्त पुढील आठवडाभर भजन, पूजन, तुलसी अर्चनासह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातून प्रथमच निघत असलेल्या श्री जगन्नाथ रथोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पंचमुखी हनुमान मंदिराचे प्रमुख महंत भक्तीचरणदास यांच्यासह जगन्नाथ रथयात्रा उत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jagannath Puri Rath Yatra
Sushma Andhare : "एकादशीला मटण खाणाऱ्यांनी.." अंधारेनी दाखवलं 'ते' पत्र, मनिषा कायंदेंवर गंभीर आरोप

रथोत्सवाच्या स्वागतासाठी शहराच्या विविध भागात स्वागत फलक लावण्यात आले आहेत. दरम्यान ओडिशातील जगप्रसिद्ध रथोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर प्रथमच निघणाऱ्या या रथोत्सवाबाबत कमालीचे औत्सुक्य आहे.

रथोत्सवाचा मार्ग असा

सकाळी दहा वाजता जुन्या आडगाव नाक्यावरील पंचमुखी हनुमान मंदिरापासून रथोत्सवाला प्रारंभ होईल. त्यानंतर जुना आडगाव नाका, गणेशवाडी, गाडगे महाराज पूल, नेहरू चौक, दहिपूल, मेनरोड, रविवार कारंजा, अहिल्यादेवी होळकर पूल, मालेगाव स्टॅन्ड,

पंचवटी कारंजा, मालवीय चौक, सीतागुंफा, श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा, नागचौकमार्गे रथ पुन्हा जुन्या आडगाव नाक्यावरून पंचमुखी हनुमान मंदिरात पोचल्यावर रथोत्सवाची सांगता महाप्रसादाने होईल.

Jagannath Puri Rath Yatra
Pankaja-Dhananjay : भाऊ-बहिणीच्या नात्याचं नवं पर्व; पंकजांसाठी धनंजय मुंडे एक पाऊल मागे, भविष्यात...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com