esakal | फ्री प्लॅटफॉर्म तिकीट हवयं.. तर मग मारा तीस जोरबैठका..! 
sakal

बोलून बातमी शोधा

free-railway-ticket.jpg

अनेक वेळा कामाच्या व्यापामुळे नागरिकांना आरोग्य सुदृढ राखण्यासाठी व्यायाम करायला वेळ मिळत नाही. म्हणून रेल्वेने प्रवाशांचा प्रवास रेल्वेने सुरू होण्याआधी दिल्ली येथे व्यायामगणना करणारे यंत्र बसविले आहे. महाराष्ट्रात मुंबई, नाशिक, कल्याण, सीएसटी, दादर, भुसावळ, नागपूर या ठिकाणी यंत्र बसविण्यासाठी तयारी दर्शविली आहे. यामुळे रेल्वेस्थानकावर फिरणारे नागरिक स्वयंस्फूर्तीने व्यायाम करतील.

फ्री प्लॅटफॉर्म तिकीट हवयं.. तर मग मारा तीस जोरबैठका..! 

sakal_logo
By
हर्षवर्धन बोऱ्हाडे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक  : रेल्वेने प्रवाशांच्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना आणल्या असून, हेल्थ एटीएम, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वातानुकूलित आराम खोल्या, वजन तपासण्यासाठी वजनकाटे याबरोबरच आता एक नवीन योजना महाराष्ट्रातील काही प्रमुख रेल्वेस्थानकांवर सुरू होणार आहे. यात नाशिकचाही समावेश असून, प्रवाशांचा व्यायाम गणना करणारे यंत्र बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यात 30 जोरबैठका मारल्यावर पाच रुपयांचे फलाट तिकीट मोफत मिळणार आहे. 

प्रवाशांच्या आरोग्यासाठी रेल्वे बसविणार व्यायाम मोजणारे यंत्र 
राजधानी दिल्ली रेल्वेस्थानकावर सध्या यंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या यंत्राचा उपयोग तरुण पुरुष व थोड्या प्रमाणावर महिला करीत आहेत. रेल्वे प्रवास सुरू करण्याआधी प्रवासी तंदुरुस्त राहणे आवश्‍यक आहे. अनेक वेळा कामाच्या व्यापामुळे नागरिकांना आरोग्य सुदृढ राखण्यासाठी व्यायाम करायला वेळ मिळत नाही. म्हणून रेल्वेने प्रवाशांचा प्रवास रेल्वेने सुरू होण्याआधी दिल्ली येथे व्यायामगणना करणारे यंत्र बसविले आहे. महाराष्ट्रात मुंबई, नाशिक, कल्याण, सीएसटी, दादर, भुसावळ, नागपूर या ठिकाणी यंत्र बसविण्यासाठी तयारी दर्शविली आहे. यामुळे रेल्वेस्थानकावर फिरणारे नागरिक स्वयंस्फूर्तीने व्यायाम करतील. त्यामुळे फलाट तिकीट त्यांना मोफत मिळेल, असा उद्देश आहे. यासाठी सध्या रेल्वे विभाग संशोधन आणि विकास या तत्त्वावर रेल्वेस्थानकाची पाहणी करत असून, सहा महिन्यांत ही यंत्रे रेल्वेस्थानकावर लागणार आहेत. प्रवासी या यंत्रांचा वापर नियमितपणे करतील, असा विश्‍वास रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

असे आहे यंत्र 
रेल्वेस्थानकांवर बसविण्यात येणारे यंत्र स्क्रीनच्या समोर उभे राहिल्यावर मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषांत व्यायाम सुरू करण्यासाठी आदेशित करते. जोरबैठका काढायला सुरवात केल्यानंतर प्रत्येक जोरबैठकीचे गणन होते. तीस बैठका काढल्यानंतर आपापल्या यंत्रातून फलाट तिकीट मोफत मिळते. ते आपल्या उत्तम आरोग्याबद्दल शुभेच्छाही देते. 

हेही वाचा > जेव्हा लॉजवर गणवेशधारी शाळकरी मुलामुलींची धांदल उडते....पोलिसही चक्रावले!

नागरिकांच्या आरोग्यासाठी ही अतिशय चांगली योजना
नागरिकांच्या आरोग्यासाठी ही अतिशय चांगली योजना असून, याचा वापर नागरिकांनी करायला हवा. यामुळे रक्ताभिसरण क्रिया चांगली राहू शकते. -डॉ. प्रवीण बोरा 

जोरबैठका काढून छाती, पोटऱ्या, कंबर व पाय तंदुरुस्त राहतात. यामुळे स्नायूंचा व्यायाम होऊ शकतो. या यंत्राचा महिलांनी न लाजता वापर केला पाहिजे. -संध्या देशमाने, योग प्रशिक्षक 

हेही वाचा > थरारक! साक्षात समोर मृत्यू उभा असताना "माऊलीला" कुठे जीवाची पर्वा होती? तिचा जीव बाळामध्येच...


सुटीव्यतिरिक्त व्यायामाला वेळ देता येत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुले या यंत्राच्या सहाय्याने व्यायाम करू शकतात. नाशिक रोडला दोन्ही प्रवेशद्वारांवर ही यंत्रे बसवायला हवीत. -पप्पू कोहली, प्रवासी 

loading image