दिंडोरी तालुक्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची १७ लाखांची फसवणूक

grapes
grapesesakal

दिंडोरी (जि. नाशिक) : तालुक्यातील पाच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची १७ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी सहा व्यापाऱ्यांविरुद्ध शुक्रवारी (ता. १८) दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Five grape grower farmers have been defrauded of more than Rs 17 lakh)


आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी दिंडोरी पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केली. या प्रकरणात पुणे येथील पाडवा ग्रीन सोल्यूशन्स कंपनीचा भागीदार अमित देशमुख (रा. मध्यप्रदेश), भूषण पवार (रा. देवपूर), विशाल विभुते (रा. धुळे), अमोल चव्हाण (रा. कोथरुड), सागर जगताप (रा.बारामती), संतोष बोराडे (रा. निफाड) अशी फसवणूक केलेल्या संशयित व्यापाऱ्यांची नावे आहेत. या सर्व शेतकऱ्यांना द्राक्षमालाच्या रकमचे दिलेले धनादेश वटले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी दिंडोरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

grapes
गुजरातसह नाशिक जिल्ह्यातही वटविल्या त्या नोटा?



फसवणूक झालेले शेतकरी द्राक्ष माल (किलो) रक्कम

  1. सुनील शिंदे ११, २८६ किलो पाच लाख २६ हजार १७१ रु.

  2. अनिल मालसाने (निगडोळ) ८, ७०१ किलो चार लाख ८ हजार ५०५ रु.

  3. संजय वाघ (नळवाडी) ९, २६७ किलो पाच लाख ९८ हजार ८५५ रु.

  4. शरद मालसाने (निगडोळ) ६, ६८५ किलो तीन लाख ७६ हजार ९० रु.

  5. रघुनाथ पाटील (वरखेडा) ६, ५०३ किलो दोन लाख ८२ हजार ३६५ रु.

    (Five grape grower farmers have been defrauded of more than Rs 17 lakh)

grapes
नाशिक शहरात १५१ घरे अतिधोकादायक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com