"कब्र को मिट्टी देने चलो भाईयों..'मालेगावमध्ये दफनविधीचे आकडे वाचून व्हाल अवाक 

malegaon kbrathan.png
malegaon kbrathan.png

नाशिक / मालेगाव : शहरातील कोरोनाचा उद्रेक रमजान काळात काहीसा कमी झाला. त्याला विविध कारणे आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घटली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81 टक्‍क्‍यांवर आले. मात्र, अद्यापही शहरातील मयतीचे "मिट्टी देने चलो भाईयों' पुकारे कमी होण्याची लक्षणे दिसत नाहीत. पूर्व-पश्‍चिम दोन्ही भागातील रुग्णालये सुरू झाल्यानंतरही ही स्थिती व वाढता मृत्युदर चिंता वाढविणारा असल्याने रमजान ईदची तिवासी साजरी झाल्यानंतर शहरवासीयांनी काळजी घेणे गरजेचे आहे. 

वाढता मृत्युदर ठरतोय मालेगावकरांची डोकेदुखी 
येथील बडा व आयेशानगर या दोन कब्रस्तानांत 27 मेअखेर 519 दफनविधी झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ते दुप्पट आहे. एप्रिलमध्ये हे प्रमाण तिप्पट होते. त्यात थोडी घट झाली हाच काय तो दिलासा. 2019 मध्ये बडा कब्रस्तानात मेमध्ये 207 व आयेशानगर कब्रस्तानमध्ये 45 असे एकूण 252 दफनविधी झाले. या वर्षी 27 मेपर्यंत बडा कब्रस्तानात 341, तर आयेशानगर कब्रस्तानमध्ये 178 दफनविधी झाले.

दोन्ही कब्रस्तानांत मेमध्ये पाचशेवर दफनविधी 
आयेशानगर येथील दफनविधी तिपटीने वाढले आहेत. बडा कब्रस्तानात हे प्रमाण दीडपट जास्त आहे. 2 मेस सर्वाधिक 37 दफनविधी झाले. 7 व 10 मेस प्रत्येकी 30, तर 5 मेस 34 म्हणजे चार दिवसांतच 131 जण मातीत गेले. गेल्या दहा दिवसांत बडा कब्रस्तानातील दफनविधी नोंद 12 ते 15 वर आली आहे. 18 व 21 मेस सर्वांत कमी प्रत्येकी सात दफनविधी झाले. बडा कब्रस्तानात 2018 मे महिन्यात फक्त 195 दफनविधी झाल्याची नोंद आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com