दहा वर्षांपासून जडलेला आजारानंतर 'सुरेखा मत्सागर' यांच्या जीवनात पुन्हा प्रकाश...!

surekha matsagar.jpg
surekha matsagar.jpg

नाशिक : (पालखेड) दहा वर्षांपासून जडलेला डोळ्यांचा आजार, तर पाच वर्षांपासून उपचार करूनही दूर न झाल्याने हताश झालेल्या सुरेखा मत्सागर यांच्या जीवनात पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे, तो केवळ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. सुनील शेजवळ यांनी दाखविलेल्या हिमतीमुळे. 

दहा वर्षांपासून होता डोळ्यांचा आजार
 
रामाचे पिंपळस (ता. निफाड) येथील अल्पभूधारक शेतकरी रमेश मत्सागर यांच्या पत्नी सुरेखा मत्सागर यांना दहा वर्षांपासून डोळ्यांचा आजार झाला होता. यामुळे त्यांची दृष्टी कमी होत चालली होती. तो दूर करण्याकरिता त्यांनी कधी उसने, तर कधी व्याजाने पैसे घेऊन उपचार केले. याकरिता नाशिक, नगर, जालना येथील मोठमोठ्या रुग्णालयांत पैसा खर्च करूनही उपचार केल्यानंतरही सुरेखा मत्सागर यांना दिसण्यास फरक पडला नव्हता. पाच वर्षांपासून श्रीमती मत्सागर यांना दोन्ही डोळ्यांनी दिसणे खूप कमी झाले आणि डाव्या डोळ्याने अंधुकसा प्रकाश, तर उजव्या डोळ्याने तीन फूट अंतरावरील वस्तू अंधूक दिसू लागल्या. नामांकित रुग्णालयात उपचार घेतांना डोळ्यांना काचबिंदू व मोतीबिंदू असे दोन आजार होते. काचबिंदू आणि मोतीबिंदू एकत्र असल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया खूपच अवघड असते. ती सर्वच नेत्ररोगतज्ज्ञ करू शकत नाहीत. त्यांच्यावर फक्त औषधांचे उपचार करण्यात येत होते. शस्त्रक्रिया करण्याचे धाडस कोणीही करत नव्हते. यातच पिंपळगाव बसवंत येथील नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. सुनील शेजवळ यांनी वैद्यकीय व्यवसायाबरोबरच सामाजिक भान जपत हे आव्हान स्वीकारत सुरेखा मत्सागर यांच्या डोळ्यावर गुंतागुंतीची व क्‍लिष्ट शस्त्रक्रिया कुठल्याही प्रकारे टाका, पट्टी, इंजेक्‍शन न देता यशस्वी करून दिली. 

या शस्त्रक्रियेमुळे सुरेखा मत्सागर यांच्या आयुष्यात नवीन दिवस उजाडला तो स्पष्ट दिसण्यासह. डाव्या डोळ्यावर 25 फेब्रुवारीला शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना दहा फुटांपर्यंत स्पष्ट दिसू लागले, तर 5 मार्चला झालेल्या शस्त्रक्रियेनंतर सुरेखा मत्सागर यांना 40 फुटांपर्यंत स्पष्ट दिसू लागले. पत्नीला स्पष्ट दिसू लागल्याचा आनंद या वेळी रमेश मत्सागर यांच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता. 

सुरेखा मत्सागर यांच्यावरील केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेपासून आजवर केलेल्या प्रत्येक शस्त्रक्रियेचा अनुभव अविस्मरणीय आहे. यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या भावनिक प्रतिक्रिया ऊर्जा देणाऱ्या ठरतात. दृष्टी प्राप्त झाल्यानंतर रुग्णाच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद आजही शब्दात व्यक्त करण्यासारखा नाही. - डॉ. सुनील शेजवळ, संचालक, नेत्रलक्ष्मी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com