Flower Farming
sakal
नाशिक: भारतीय फूल शेतीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोहोर उमटविली आहे. एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत देशातून तब्बल २१ हजार २४ टन फुले व त्यांच्या उत्पादनांची निर्यात झाली आहे. यातून देशाला ७४९ कोटी रुपयांचे परकी चलन मिळाले आहे. कृषी आणि प्रक्रिया, अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार ही आकडेवारी फूल उद्योगाच्या सातत्यपूर्ण वाढीचे निदर्शक मानली जात आहे.