esakal | नवरात्रोत्सवामुळे फुलला फूलबाजार
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik

नवरात्रोत्सवामुळे फुलला फूलबाजार

sakal_logo
By
केशव मते

पंचवटी (नाशिक) : नवरात्रोत्सवाचे (navratri) चैतन्यपर्व सुरू होत असल्याने सर्वच उत्साहाचे वातावरण आहे. नवरात्रोत्सव, तसेच मंदिराची कवाडेही त्यानिमित्ताने खुली होत असल्याने बुधवारी (ता. ६) गणेशवाडीतील फूलबाजारात लाखो रुपयांची उलाढाल झाली. यात झेंडूच्या फुलांना अधिक मागणी होती.

नवरात्रोत्सवामुळे झेंडूच्या फुलांना मोठी मागणी राहणार आहे. त्यामुळे गणेशवाडीतील फूल बाजारात मोठ्या प्रमाणावर झेंडू दाखल झाला आहे. गणेशवाडीपासून संपूर्ण गाडगे महाराज पूर, गौरी पटांगणावर आज हा बाजार चांगलाच बहरला होता. झेंडूच्या एका क्रेटसाठी शंभर ते दीडशे रुपये असा दर होता. तुलनेत झेंडूव्यतिरिक्त इतर फुलांना मागणी नव्हती. मात्र, झेंडूच भाव खाऊन गेल्याचे अनेक विक्रेत्यांनी सांगितले.

मागील आठवड्यापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे इतर पिकांबरोबरच नगदी पीक म्हणून गणल्या गेलेल्या फूल शेतीचे मोठे नुकसान झाले. पाऊस व खराब हवामानामुळे फुलांचे मोठे नुकसान झाल्याचे फूल उत्पादक सदाशिव जेजुरकर यांनी सांगितले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अर्धेच उत्पादन आल्याचे त्यांनी सांगितले. आता उत्पादन घटल्याने बाजारात फुलांना तेजी असलीतरी वाढीव खर्चामुळे अनेक फूल उत्पादक शेतकरी हतबल झाल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: इचलकरंजी : गणेशोत्सवामुळे फुलांना वाढली मागणी

बाजारात मोठी तेजी

पितृपक्षामुळे गत पंधरवड्यात फुलांना विशेष मागणी नव्हती. मात्र, नवरात्रोत्सवासह उद्यापासून मंदिरेही उघडत असल्याने फूल बाजारात मोठी तेजी दिसून आली. मागील आठवड्यात कोमेजलेला बाजार मागणी वाढल्याने उत्साहाचे वातावरण होते. एरवी केवळ सकाळच्या सुमारास बहरणाऱ्या फूल बाजारात दिवसभर खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली होती. नाशिकसह निफाड, चांदवड, दिंडोरी, इगतपुरी आदी भागातून फूल विक्रेते शेतकरी भल्या पहाटेच बाजारात दाखल झाले होते.

हेही वाचा: 'सराफ सुवर्णकार'च्या संपात आम्ही सहभागी होणार नाही !

वाहतूक कोंडी नित्याचीच

कधीकाळी सराफ बाजारात भरणारा फूल बाजार गणेशावाडीत स्थलांतरित झाल्यावर सुरवातीला अनेक विक्रेत्यांनी याठिकाणी व्यवसाय करण्यास नकारघंटा वाजविली होती. परंतु, हळूहळू हा बाजार चांगलाच बहरू लागल्याने मोठी गर्दी उसळू लागली आहे. मात्र, ही गर्दी भर रस्त्यावर होत असल्याने सकाळी शहरातून आडगाव नाक्याकडे किंवा शहराकडे येणाऱ्या वाहनधारकांना सकाळी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे

loading image
go to top