Shravan 2022 : फुलांच्या दरात उसळी

Nashik Flower Market
Nashik Flower Marketesakal
Updated on

नाशिक : श्रावण महिन्यामुळे सर्वच प्रकारच्या फुलांच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. एरवी २० ते ३० रुपयांत मिळणाऱ्या हारासाठी आता ५० रुपये मोजावे लागत आहेत. भगवान शंकराला प्रिय असलेल्या बेलाला अधिक मागणी आहे. दरम्यान, श्रावणमासामुळे कपालेश्‍वरासह पंचवटीतील सर्वच मंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलली आहेत.

श्रावण महिना सुरू असल्याने सर्वच प्रकारच्या फुलांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे झेंडूसह सर्वच फुलांच्या दराने उसळी घेतली आहे. त्यामुळे दहा रुपयांत उपलब्ध असलेला मिक्स फुलांचा वाटा २० रुपयांत, तर २० ते ३० रुपयांना मिळणार फुलांचा हार आता ४० ते ५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. (Flower prices increased nashik Shravan 2022 Latest Marathi News)

Nashik Flower Market
कोरोना नियम शिथिलतेने गणेशमूर्तींना मोठी मागणी

फुलांचे दर असे

-गुलाब : २० ते २५ रुपयांला १२ फुलांची गड्डी

-शेवंती : २०० रुपये किलो

-झेंडू : १२० रुपये किलो

-ॲस्टर : २०० रुपये किलो

-निशिगंध : २०० रुपये किलो

शंभर रुपयांत हार

फुलांच्या दरात वाढ झाल्याने छोटे हार ५० रुपये, तर मोठ्या हारांची किंमत शंभर रुपयांपलीकडे पोहोचली आहे. फुलांच्या दरात वाढ झाल्याने हारांच्या किमतीत वाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचे विक्रेते सांगतात.

अर्थकारणाला बुस्ट

श्रावण महिन्याचे औचित्य साधत पंचवटीतील अनेक मंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलली आहेत. रामकुंडासह श्री कपालेश्‍वर, श्री काळाराम दर्शनासह भाविकांची पसंती निसर्गरम्य तपोवनालाही मिळत आहे. यानिमित्त पंचवटीच्या अर्थकारणासही काही प्रमाणात बुस्ट मिळाला आहे. कोरोनामुळे दोन वर्षे येथील मंदिरांसह सर्वच व्यवहार ठप्प झाले होते.

Nashik Flower Market
Dhule : खानदेशात कानबाई उत्सावाची धूम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Education expert Bhausaheb Chaskar urged immediate restructuring of the Teacher Eligibility Test to improve the quality of school education.
Tukaram Mundhe milk adulteration complaint
Who is Prashant Wadile?
MP Supriya Sule
Marathi News Esakal
www.esakal.com